Home /News /entertainment /

Video: हळद अन् मेहंदी समारंभात ह्रताने केली धम्माल, व्हिडीओ व्हायरल

Video: हळद अन् मेहंदी समारंभात ह्रताने केली धम्माल, व्हिडीओ व्हायरल

Video: हळद अन् मेहंदी समारंभात ह्रताने केली धम्माल, व्हिडीओ व्हायरल

Video: हळद अन् मेहंदी समारंभात ह्रताने केली धम्माल, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री ह्रताच्या लग्नाची गेली दोन चर्चा सुरू आहे. ह्रता सध्या नवऱ्यासोबत हनिमून एंजॉय करत आहे. तर दुसरीकडे तिच्या मेहंदी आणि हळदीचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

  मुंबई, 21 मे: सेलिब्रेटींची लग्न म्हटली की मोठा गाजावाजा केला जातो मात्र अस काहीही न करता गपचुप लग्न आटोपणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule ) ह्रताने प्रतिक शाहसोबत (Prateek Shah) लग्नगाठ बांधली असून सिनेसृष्टीतील सर्वांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  लग्नानंतर आता दोघेही हनिमूनसाठी भारताबाहेर गेले आहेत. दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे दोघे त्यांच्या लग्नातील सोनेरी क्षण त्यांच्या चाहत्यांसोबत देखील शेअर करताना दिसत आहेत. दोघांनी लग्नाच्या रिस्पेशनचे फोटो शेअर केले. त्यामागोमाग ह्रताच्या हळदीचे आणि मेहंदीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे. (hruta durgule wedding mehandi and halad ceremony) ह्रताच्या फॅन पेजवरुन तिच्या ग्रहमक, मेहंदी आणि हळदी समारंभातील काही क्षण व्हिडीओ रिलच्या माध्यमातून शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओत ह्रता फारच सुंदर दिसत असून नवरीच्या वेशातल्या ह्रताला पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत.
  हेही वाच - Hruta Durgule Wedding: लग्नाला न आल्याने ह्रताच्या सासूने भरला अंजिक्यला दम, म्हणाल्या आता... ह्रताच्या लग्नाआधीच्या सगळ्या विधी तिच्या घरी पार पडल्या. पहिल्या दिवशी मेहंदी कार्यक्रमाला ह्रताच्या सगळ्या मैत्रिणींनी तिच्या घरी हजेरी लावली होती. सगळ्यांनी ह्रताच्या मेहंदी सोहळ्यात फुल धम्माल केल्याचं दिसून येत आहे. ह्रता देखील फार आनंदी होती. 'लग्नातील पहिला आणि दुसरा अमेझिंग दिवस', असं कॅप्शन देत ह्रताच्या फॅन पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Hruta Durgule (@hruta12)

  ह्रताची बेस्ट फ्रेंड आणि सहकलाकार अभिनेत्री तृषाला सगळ्या विधींना हजर होती. ह्रताच्या ग्रहमक विधीत तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य देखील उपस्थित होते. तिने देखील लग्नातील काही व्हिडीओ शेअर केलात. मेहंदी वेळी ह्रता फारच सोज्वळ आणि भावूक झालेली दिसली. ह्रताने देखील तिच्या हळदीचे काही व्हिडीओ शेअर केले होते. ह्रताने लग्नात केलेल्या साध्या लूकने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ह्रताने लग्नविधींसाठी पिवळी साडी नेसली होती. तिच्या साडीला थोडा साऊथ इंडियन लूक देण्यात आला होता. तर रिसेप्शन वेळी ह्रताने गाऊन घातला होता. लग्नाच्या शेवटच्या दिवसातही ह्रता कामात गुंतली होती. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या विदेश दौऱ्यानंतर ह्रता लग्नाच्या तयारी लागली. तसेच 'मन उडू उडू झालया' मालिकेतील काही एपिसोड देखील पूर्ण केले आहे. सेटवर अर्धा वेळ काम करुन ह्रताने लग्नाची खरेदी केली असं तिचा सहकलाकार अजिंक्य राऊतने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Wedding

  पुढील बातम्या