मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO:हृता दुर्गुळेने स्टार्ट केली ट्रान्सफॉर्मेशन जर्नी; अभिनेत्री अशी घेतेय मेहनत

VIDEO:हृता दुर्गुळेने स्टार्ट केली ट्रान्सफॉर्मेशन जर्नी; अभिनेत्री अशी घेतेय मेहनत

नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हृता दुर्गुळे एक्सरसाईज करत असल्याचं दिसून येत आहे.

नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हृता दुर्गुळे एक्सरसाईज करत असल्याचं दिसून येत आहे.

नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हृता दुर्गुळे एक्सरसाईज करत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई, 30सप्टेंबर- अभिनेत्री हृता दुर्गुळेने (Hruta Durgule) नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर(Share Video) केला आहे. यामध्ये अभिनेत्री फिटनेसवर(Fitness) जाम मेहनत घेताना दिसून येत आहे. हृताने वेट लॉस जर्नी सुरु केल्याचं या व्हिडीओवरून दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta (@hruta12)

आजच्या धावत्या युगात फिटनेसकडे लक्ष देणं अत्यंत कठीण झालं आहे. मात्र त्यामधूनही वेळ काढून कलाकार आपला फिटनेस जप्त आहेत. कलाकारांना आपल्या लुक्सवर, फिटनेसवर कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं असतं. हे कलाकार फिट राहण्यासाठी वाटेल ते कष्ट घ्यायला असतात. रात्रंदिवस एक्सरसाइज आणि डाएट करून कलाकार आपला फिटनेस मेंटेन ककरत असतात. मराठी असो व हिंदी प्रत्येक कलाकाराला आज फिटनेसचं वेड लागलं आहे. नुकताच सोनाली कुलकर्णीने आपली वेट लॉस जर्नी आपल्याही शेअर केली होती. तर अमृता खानविलकरही सतत योगा करून स्वतः चा फिटनेस मेंटेन करताना दिसून येते.

(हे वाचा:दे धक्का 2:अखेर तारीख ठरली! या दिवशी चित्रपट येणार भेटीला)

नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हृता दुर्गुळे एक्सरसाईज करत असल्याचं दिसून येत आहे. हृताने व्हिडीओ शेअर करत आपण आपलं ट्रान्सफॉर्मेशन सुरु केल्याचं म्हटलं आहे. हृताने एक महिना झालं वेट लॉस सुरु केलं आहे. महत्वाचं म्हणजे हृताला चांगला रिजल्टसुद्धा मिळाला आहे. १ महिन्यात ३ इंच कमी झाल्याचं हृताने म्हटलं आहे. हृताने ऑनलाईन क्लासद्वारे हे ट्रान्सफॉर्मेशन सुरु केलं आहे. शिवाय ती योग्य न्यूट्रीशियनसही फॉलो करत आहे. हृताचं ट्रान्सफॉर्मेशन पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत. म्हणजे लवकरच ही अभिनेत्री आपल्याला जबरदस्त फिटनेससह दिसून येणार आहे.

(हे वाचा:शिवलीला पाटीलला अचानक 'या' कारणास्तव सोडावं लागलं Bigg Boss Marathi चं घर!)

हृताने अनेक मराठीमालिकांमधून आपलं मन जिंकलं आहे. मात्र 'फुलपाखरू' या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतलं वैदेही आणि मानसच्या जोडीने तरुणाईवर भुरळ घातली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणारी हृता रसिक प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. काही दिवसांपासून हृतामध्ये थोडा बदल जाणवत आहे. तीच वजन आधीपेक्षा थोडं जास्त दिसत आहे. असं चाहत्यांमध्ये म्हटलं जात होतं. त्यांनतर आता हृताने ट्रान्सफॉर्मेशन सुरु केल्याचं सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सद्य हृता झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' मालिकेत आपल्याला दिसून येत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment