Home /News /entertainment /

हृता दुर्गुळेचा हनिमून VIDEO पाहिलात का? एकाहून एक क्यूट लुक्स आले समोर

हृता दुर्गुळेचा हनिमून VIDEO पाहिलात का? एकाहून एक क्यूट लुक्स आले समोर

हृता दुर्गुळेचा हनिमून VIDEO पाहिलात का? एकाहून एक क्यूट लुक्स आले समोर

हृता दुर्गुळेचा हनिमून VIDEO पाहिलात का? एकाहून एक क्यूट लुक्स आले समोर

अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या नवरा प्रतीक शाहसोबत तुर्कीमध्ये हनिमून सेलिब्रेशन करत आहे. नुकताच तिने हनिमूनचा व्हिडीओ शेअर केला असून तो चाहत्यांचा पसंतीस उतरला आहे.

  मुंबई, 25 मे: महाराष्ट्राची क्रश आणि सगळ्यांची लाडकी दीपू म्हणजे अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ह्रता नुकतीच लग्नबंधनात अडकली असून तुर्कीतील इस्तानबूल (Turkey Istanbul) येथे हनिमून सेलिब्रेटी करत आहे. हृताने हनिमूनचे अनेक फोटो आतापर्यंत शेअर केले होते. तिच्या फोटोमधून इस्तानबुलमधील निसर्ग सौंदर्य पाहायला मिळालं. यावेळी हृताच्या तिच्या चाहत्यांसाठी तिचा हनिमून व्हिडीओ शेअर केला आहे (Hruta Durgule honeymoon video)  इस्तानबूलमध्ये सुट्टयांचा आनंद घेणाऱ्या ह्रताने फार सुंदर व्हिडीओ शूट केले आहेत. तिच्या व्हिडीओचं खास वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री संपूर्ण व्हिडीओत वेगवेगळ्या लुक्समधून समोर येत आहेत. इस्तानबूलमध्ये असल्यापासून तिथले आतापर्यंतचे सगळे व्हिडीओ ह्रताने शेअर केले आहेत. हृताने शेअर केलेल्या हनिमून व्हिडीओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून काही वेळातच ह्रताच्या व्हिडीओ 50 हजारांहून अधिक लाईक्स आणि एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हेही वाचा - 'मुलीसाठी माझा जीव आनंदानं द्यायला तयार आहे'; दिपूच्या अपघातानं देशपांडे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर 'कारण तुम्हालाही माहिती आणि आम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे आमचं प्रेम सध्या ऑन एअर आहे', असं कप्शन देत ह्रताने व्हिडीओ शेअर केला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Hruta Durgule (@hruta12)

  'मैंने तुझे देखा' या इन्स्टाग्रामवरील सध्याच्या ट्रेंडिंग गाण्यावर ह्रताने रिल व्हिडीओ शेअर केला आहे.   व्हिडीओच्या सुरुवातीला ह्रता निऑन कलरचा ड्रेस आणि जॅकेट घेऊन समोर येते.  त्यानंतर ब्लॅक आऊटफिट्स आणि ब्लॅक जॅकेटमध्ये ह्रता दिसते. पुढच्या शॉर्टमध्ये ह्रता एका नदीच्या किनाऱ्यावर चालताना दिसतेय. इस्तानबूलच्या रस्त्यावर चालताना ह्रता फार क्यूट स्माइल करताना दिसत आहे. तर पुढच्या शॉर्टमध्ये हृता समुद्रात बोटीची सफर करताना दिसतेय. हृताचा इस्तानबूलचा व्ह्यू बघतानाचा व्हिडीओत तर फार कमाल दिसत आहे. तर ब्ल्यू वन पिसमध्ये हृताचा काहीसा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. हृता आणि प्रतीक यांनी 18 मे रोजी मुंबईत विवाह केला.हृताचे कुटुंबीय आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. हृताने लग्नात केलेला तिचा खास लुक सर्वांच्या पसंतीस उतरला. हृताचा लग्नातील लुकपेक्षा तिच्या मंगळसुत्रांची फार चर्चा झाली. हृताने लग्नात एकूण 4 मंगळसूत्र घातली होती.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या