मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hruta Durgule : आई नाही तर 'या' नावानं ह्रता सासूबाईंना मारते हाक; वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत म्हणाली...

Hruta Durgule : आई नाही तर 'या' नावानं ह्रता सासूबाईंना मारते हाक; वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत म्हणाली...

hruta Durgule with her mother in law

hruta Durgule with her mother in law

हृता दुर्गुळे आणि मुग्धा शाह या सासू सुनांची जोडी प्रचंड फेमस आहे. दोघीही खूप स्टाईलिश आहेत. या दोघींची केमिस्ट्री बघायला प्रेक्षकांना आवडतं.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 9 ऑगस्ट : अभिनेत्री  हृता दुर्गुळे सध्या सगळ्या माध्यमांत प्रचंड गाजत आहे. मालिका आणि नाटक विश्वासहित आता तिने चित्रपटात देखील नाव कमावले आहे.  'टाइमपास ३' आणि 'अनन्या' हे तिचे चित्रपट प्रचंड हिट झाले. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. त्याचबरोबर तिच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले. तसेच तिच्या  'मन उडू उडू झालं' या मालिकेचा देखील पहिल्या पाच मालिकेत नंबर आहे. हृता दुर्गुळे काही महिन्यांपूर्वीच  विवाहबंधनात अडकली आहे. तिने प्रसिद्ध  दिग्दर्शक आणि निर्माता प्रतिक शाह याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.  ती तिचे विविध फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. हृताची सासू देखील मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हृताच्या सासूबाईंचं नाव मुग्धा शाह असं आहे. त्यांनी हिंदी मालिकांमध्ये काम करत अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

आज हृताने सासूबाईंचा वाढदिवस आहे. त्या निमित्त हृताने  खास पोस्ट शेअर केली आहे. हृताने शेअर केलेल्या या फोटोत ती तिच्या सासूबाईंना मिठी मारताना दिसतेय. तिने या फोटोला छान कॅप्शन देत हा फोटो पोस्ट केला आहे. हृता-प्रतीकच्या लग्नादरम्यानचा हा फोटो आहे. हृताने हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करताना असं म्हटलं आहे की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मा, तुम्ही आहात तशाच राहा! खंबीर, निर्भय आणि स्वतंत्र'. हृताने शेअर केलेल्या फोटोतून सासू-सुनेतील प्रेम दिसून येत आहे.

हेही वाचा - Srushti Pagare : स्वामिनीतील छोटी रमा दिसणार नव्या भूमिकेत; 'या' मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

त्या दोघींमध्ये खूप छान बॉण्डिंग दिसून येतं. टाईमपास २ च्या चित्रपटासाठी सुद्धा हृताच्या  सासूने तिचं  कौतुक केलं होतं . या दोघींची सासू सुनेची जोडी अत्यंत स्टायलिश आहे.

हृताच्या  सासू  मुग्धा शाह या हिंदी आणि मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मुग्धा यांनी ‘बे दुणे साडेचार’, ‘मिस मॅच’, ‘असंभव’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे मुग्धा यांनी मराठी, हिंदी बरोबरच गुजराती मनोरंजन विश्वातही लोकप्रियता मिळवली आहे.  हृताचा अलीकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा 'टाइमपास ३'च्या प्रीमियरला देखील तिच्या सासूबाई उपस्थित होत्या. यावेळी हृता आणि मुग्धा या सासू-सुनेत असलेलं छान बाँडिंगही दिसत होतं.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment