Home /News /entertainment /

Hruta Durgule Prateek Shah Wedding : ह्रता दुर्गुळेनं प्रतीक शाहसोबत गुपचूप केलं लग्न, लग्नाचे सुंदर Photos आले समोर

Hruta Durgule Prateek Shah Wedding : ह्रता दुर्गुळेनं प्रतीक शाहसोबत गुपचूप केलं लग्न, लग्नाचे सुंदर Photos आले समोर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी आज मुंबईत लग्नगाठ बांधली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी आज मुंबईत लग्नगाठ बांधली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी आज मुंबईत लग्नगाठ बांधली आहे.

  मुंबई, 18 मे - Hruta Durgule Prateek Shah Wedding :  मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी आज मुंबईत लग्नगाठ बांधली आहे. यासंबंधी ई टाईम्सनं वृत्त दिलं आहे. या दोघांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळता मित्रपरिवार उपस्थित होता. या दोघांकडून मात्र  याबद्दल अधिकृत कोणतीच माहिती  ( hruta durgule and prateek shah wedding photos )  समोर आलेली नाही. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो (  hruta durgule and prateek shah wedding)  समोर आलेला आहे. चाहत्यांकडू या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ई टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनी दुपारी लग्न केलं आहे. लग्नात या दोघांनी पारंपारिक लुक केला होता. लग्न झाल्यानंतर जवळच्या मंडळींनी या जोडीला शुभ आशिर्वाद दिला. यावेळी ही जोडी आपला आनंद लपवू शकली नाही. मात्र, अद्याप  दोघांपैकी कोणीही त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते मात्र अतुर झाले आहेत. ह्रता  दुर्गुळेने  बॉयफ्रेंड प्रतीक शाह याच्याशी शुक्रवारी, 24 डिसेंबर 2021 रोजी साखरपुडा केला होता. यानंतर आज तिनं प्रतिकसोबत लग्नगाठ बांधल्याचं समोर आलं आहे. वाचा-नवरा मेहुलसाठी अभिज्ञाची खास पोस्ट, बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत म्हणाली... ह्रता  दुर्गुळेनं सोशल मीडियाच्या माध्यामातून रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. प्रतीक आणि ह्रता  सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री ह्रता   दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. तिची क्रेझ पाहता मराठी अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या