S M L

हृदयांतर...इमोशनल ब्लॅकमेल !

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2017 10:45 PM IST

हृदयांतर...इमोशनल ब्लॅकमेल !

अमित मोडक, समीक्षक

              'हृदयांतर'मध्ये एक सुंदर सीन आहे. फर्स्टेट झालेला सुबोध डिओर्स घेऊ नको म्हणून समजावणाऱ्या, त्याच्या मॅरेज कॉन्सलर मैत्रिणीला सांगतो. बारा तास जॉब करतो, घरी जातो. शांतता हवी असते. नेमकं तेव्हाच बायकोला बोलायचं असतं, बोलायला हरकत नाही पण बोलताना फोन आला तरीही चालत नाही. ऑफिसमधला प्रत्येक प्रॉब्लेम सहज सोडवतो पण घरातला प्रॉब्लेम सोडवता येत नाही. तेव्हा हा शेखर कनेक्ट करतो. प्रेक्षकांना तो आपल्यातला वाटतो. खासकरून तरुणाईला...

आजूबाजूला असे अनेक शेखर आणि समायरा आहेत. आजची डिव्होर्सची कारणं कदाचित आपल्या आई-वडिलांच्या पिढीला न पटणारी आहेत. मारझोड, विवाहबाह्यसंबंध अशी काही मोठी कारणं असतील तरच डिव्होर्स.  खुंटलेला संवाद, कुटुंबाला वेळ न देणं, कनेक्ट न वाटणं ही कारणं मोठी वाटत नसली तरी आजचं वास्तव आहे. करिअरची गणितं सोडवता सोडवता, नाती मागे पडतात. शेखर आणि समायरा यांच्या नात्यातला प्रॉब्लेम आजचा आहे.



शेखर बिझनेसमन आहे. समायरा वर्किंग वाईफ आहे. त्यांना दोन गोड मुली आहेत. १२ वर्षांच्या संसारानंतर असं वळण येतं जिथं दोघंही फक्त नातं निभवतात. आपल्या कामात गुंतलेल्या शेखरबाबत समायरच्या अनेक तक्रारी आहेत आणि समायराच्या तक्रारी, डिमांड कशा अवाजवी आहेत, याचं शेखरचं व्हर्जन आहे. शेखर-समायरा त्यांच्यातले प्रश्न कनेक्ट होतात आणि इथंच माझ्या 'हृदयांतर'कडून अपेक्षा वाढल्या. वाटलं प्रॅक्टिकल सिनेमा आहे. शेखर-समायराच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा सिनेमा प्रयत्न करील.

पण तसं घडलं नाही. हे प्रॉब्लेम फेस करणारे कपल्स जितके कन्फ्यूज आहेत तितकाच हा सिनेमा. विक्रम फडणीस यांनीही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आधार घेतला तो इमोशन्सचा. डिव्होर्सपर्यंत ताणला गेल्यावर सिनेमामध्ये एक इमोशनल ट्विस्ट येतो. अनेक हिंदी सिनेमांमध्ये बघितलेला ट्विस्ट. थेट प्रश्नाला हात घालण्याऐवजी इमोशनल ट्विस्टच्या आधारानं सिनेमा पुढे सरकतो आणि नंतर हा ट्विस्टच मूळ कथानकावर 'हावी' होतो. दोन वेगवेगळ्या प्लॉटला गुंतवून एक प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात 'हृदयांतर'चं मूळ कथानक मागे पडतं. हळूहळू ते हरवतं...

Loading...
Loading...

मुक्ता बर्वेनं रंगवलेली कणखर समायरा भुरळ घालते. तिच्यातली आई तुम्हाला इमोशनल करते. सुबोध यांनी शेखरला न्याय दिलाय. अलीकडे सिनेमातला नायक सहज रडतो. हृदयांतरमध्ये जेव्हा शेखरमधला बाप हतबल होऊन रडतो त्या सीनमध्ये सुबोध यांनी कमाल केलीय. थिएटरमधून बाहेर पडल्यावरही तो सीन मी विसरू शकलो नाही. दोन्ही मुली गोड आहेत. त्यांनी त्याची भूमिका योग्यरीत्या पार पाडलीय.

विक्रम फडणीस बॉलिवूड कनेक्शन दाखवण्यासाठी अनेक हिंदी कलाकारांचं दर्शन घडवतात. हृतिक रोशन, शामक दावर, मनीष पॉल वगैरे मंडळी... हृतिकचा सीन सोडला तर बाकी पाहुण्या कलाकारांच्या सीनमध्ये काही खास मजा नाही. सिनेमा सीरियस होतोय की काय म्हणून दिग्दर्शकांनी अतुल परचुरे आणि विशाखा सुभेदारला घेऊन केलेला विनोदाचा प्रयत्न अत्यंत बालिश वाटतो. अनेक वेळा ऐकलेला विनोद पुन्हा एकदा ऐकवण्यात येतो. सेकंडहाफ खूप ताणलाय. पुढचं सगळं माहीत असल्यामुळे आपण फक्त सिनेमा संपण्याची वाट बघतो.

हा सिनेमा बघून माझं हृदयांतर झालं नाही. प्रेक्षकांच्या 'IQ'पेक्षा 'EQ'ला हात घालणाऱ्या 'हृदयांतर'ला मी देतो दोन स्टार.

सुबोध-मुक्ताच्या अभिनयासाठी हा सिनेमा नक्की बघितला जाऊ शकतो. इमोशनचा ओव्हरडोस, अनेक वेळा बघितलेले सीन्स, ताणलेली लांबी... आणि हरवलेल्या मूळ कथेसाठी तुम्ही 'हृदयांतर' टाळू शकता.

मी मात्र मुक्ता बर्वेसाठी पुन्हा एकदा सिनेमा बघू शकतो पण फास्ट फॉरवर्डमध्ये...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 09:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close