मुंबई 13 जुलै: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे केवळ अभिनयचं नाही तर इतर अनेक गोष्टींत पारंगत आहे. त्यातचं बॉलिवूडचा सुपरस्टायलिश, हॅन्डसम हंक हृतिक रोशनचा (Hritik Roshan) एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हृतिकच धम्माकेदार नृत्यकौशल्य सारेच जाणतात. अनेक चित्रपटांत , शोमध्ये त्याने आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. पण यावेळी तो गाणं गाताना दिसत आहे.
हृतिकचा ‘सुपर 30’ (Super 30) हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच सेटवरील हृतिचकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत हृतिक त्याचा 2003 साली आलेला चित्रपट ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) चित्रपटातील गाणं गात आहे.
करीना कपूरचं पुस्तक वादाच्या भोवऱ्यात; लवकरच होऊ शकते कायदेशीर कारवाई
‘जादू’ (Jadu song) हे गाणं तो बिहारी रंगात गात आहे. तसेच तो चित्रपटातील पात्राच्या अवतारातच दिसत आहे. सेटवरचा हा व्हिडीओ हृतिकच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. त्यावर त्याला अनेक कमेंट्सही मिळत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही हृतिकचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
याआधीही हृतिकचा एक व्हिडीओ असाच व्हायरल झाला होता. याआधीही हृतिकने आपलं संगीत कौशल्य दाखवलं होतं. ‘एक पल का जीना’ (Ek Pal Ka Jeena) हे सुपरहीट गाणं त्याने गायलं होतं. न्यू इयर पार्टीतीत त्याने हे गाणं गायलं होतं. त्याचा हा व्हिडीओ देखील तुफान हीट ठरला होता. गायक मिका सिंग सोबत हृतिक गाताना दिसला होता.
View this post on Instagram
नुकतीच हृतिक आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) यांचा ‘फायटर’ (Fighter) हा एरियल अँक्शन (Arial action film) चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा भारतातील पहिला एरियल अँक्शन चित्रपट असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Hritik Roshan