Home /News /entertainment /

पबवरील कारवाईत नाव आल्यानंतर सुझेन खानचं स्पष्टीकरण; नेटकऱ्यांनी ट्रोल करत म्हटलं...

पबवरील कारवाईत नाव आल्यानंतर सुझेन खानचं स्पष्टीकरण; नेटकऱ्यांनी ट्रोल करत म्हटलं...

हृतिक रोषनची आधीची बायको सुझेन खानने (Sussanne Khan) इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत पबमधील कारवाईबद्दल तिची बाजू मांडली आहे. सुझेन खानच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

  मुंबई, 23 डिसेंबर: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळात पोलिसांनी नाइट कर्फ्यू लावला आहे. मुंबईतील ड्रॅगन पॅलेस पबवर मंगळवारी पोलिसांनी रात्री 2.30 वाजता छापा टाकला होता. या पबमध्ये हृतिक रोषनची पत्नी सुझेन खानसह (Sussanne Khan) बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते. या पबमध्ये सुरेश रैना (Suresh Raina), गायक गुरु रंधावाही (Guru Randhava) उपस्थित होता. याच पार्श्वभूमीवर हृतिकच्या पत्नीने आपली बाजू मांडत एक पोस्ट लिहीली आहे. काय आहे सुझेनच्या पोस्टमध्ये? सुझेनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहीलं आहे, ‘माझ्या एका जवळच्या मित्राचा वाढदिवस होता. आम्ही सर्व मित्रमंडळी ड्रॅगन पॅलेस पबमध्ये आलो होते. अधिकारी साधारणपणे रात्री 2.30 वाजता तिथे पोहोचले. क्लबची लोकं परिस्थिती हाताळत होती. त्यावेळी आमच्यासकट तिथे आलेल्या पाहुण्यांना काही वेळ थांबवण्यास सांगितलं गेलं. जवळजवळ 3 तास आम्ही तिथे थांबलो. शेवटी 6 वाजताच्या आसपास आम्हाला तिथून जाण्यास सांगितलं. काही मीडिया रिपोर्टमध्य आम्हाला अटक करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली. त्यामध्ये कोणतही तथ्य नाही. मला हे समजत नाही की, आम्हाला नक्की कशासाठी तिथे थांबवण्यात आलं होतं. सुझेन पुढे लिहीते, ‘क्लबच्या माणसांमध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काय बोलणं झालं होतं. मी मुंबई पोलिसांचा अतिशय आदर करते. ते आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं महत्वाचं काम करतात. मुंबई पोलिसांच्या तप्तरतेमुळेच मुंबईकर सुरक्षित आहेत.’
  View this post on Instagram

  A post shared by Sussanne Khan (@suzkr)

  तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. नाइट कर्फ्यू असताना तू एवढ्या रात्री तिथे काय करत होतीस असे प्रश्न काहींनी विचारले आहेत.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Mumbai police

  पुढील बातम्या