हृतिक रोशनचा Super 30 'या' पायरसी वेबसाईटवर झाला लीक

हृतिक रोशनचा Super 30 'या' पायरसी वेबसाईटवर झाला लीक

कुठलाही चित्रपट अशा प्रकारे चोरणं, त्याची पायरेटेड कॉपी जाहीर करणं गैर आहे. तरीही अनेक सिनेमांची पायरेटेड व्हर्जन्स इंटरनेटवर उपलब्ध असतात. Hritik Roshan चा Super 30 अशाच प्रकारे लीक झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : चित्रपटकर्त्यांनी केलेली मेहनत काही क्षणांत धुळीला मिळते, जेव्हा सिनेमा चित्रपटगृहात प्रसिद्ध व्हायच्या आधीच कुठल्या तरी पायरसी वेबसाईटवर अवतरतो. पायरेटेड मूव्ही बघणारे आपल्यातलेच अनेक जण असले, तरी अशा पद्धतीची चोरी हा कायद्याने गुन्हा आहे. कुठलाही चित्रपट अशा प्रकारे चोरणं, त्याची कॉपी जाहीर करणं गैर आहे. तरीही अनेक सिनेमांची पायरेटेड व्हर्जन्स इंटरनेटवर उपलब्ध असतात. पायरसी वेबसाईट्स कुठल्या, त्यावरून नवे सिनेमे कसे डाऊनलोड करायचे हे या क्षेत्रातल्या 'दर्दीं' ना नेमकं माहिती असतं. अत्याधुनिक तंत्रज्ञआनामुळे असी पायरली उघडकीला आणणं दिवसेंदिवस शक्य होत असलं, तरी त्याच तंत्रज्ञानामुळे पायरसीसुद्धा सोपी होते आहे. नुकताच याचा अनुभव आला Hritik Roshan हृतिक  रोशनच्या सुपर 30 (Super 30) या सिनेमाला.

पायरसी रोखण्यासाठी दिल्ली हायकोर्टाने हस्तक्षेप करत अनेक वेबसाईट्सवर बंदी घालण्याची सूचना दिली होती. अशा काही पायरसी वेबसाईट्स बंद झाल्यासुद्धा. पण तमीलरॉकर्स TamilRockers ही वेबसाईट अजूनही सुरू आहे. याच वेबसाईटवर हृतिक रोशनचा Super 30 लीक झाला. या वेबसाईटवर यापूर्वी Avengers: Endgame, Oh Baby आणि Bharat हे बिग बजेट सिनेमेही बेकायदेशीरपणे उपलब्ध होते.

....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय

TamilRockers ही वेबसाईट यापूर्वी फक्त दक्षिण भारतीय विशेषतः तमीळ सिनेमे लीक करायची. पण आता मात्र पायरसीला असणारी मागणी लक्षात घेऊन त्यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या मूव्हीजसुद्धा उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. ही वेबसाईट प्रॉक्सी सर्व्हरच्या मदतीने काम करते. त्यामुळे याचा पत्ता लावणं अवघड जातं. कबीर सिंग हा सुपरहिट सिनेमासुद्धा या वेबसाईटवर लीक झाला होता.

या अभिनेत्रीच्या भावानं केलं टीव्ही अॅक्ट्रेसशी लग्न; शेअर केले बोल्ड फोटो

अभिनेता हृतिक रोशनचा सिनेमा Super 30 चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सिनेमात बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे. या सिनेमात हृतिकने गणित शिकवणारे शिक्षक आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

ते दरवर्षी गरीब घरातील पण अभ्यासात हुशार अशा ३० मुलांची निवड करतात आणि त्यांना आयआयटीचं ट्रेनिंग देतात. त्यांना शिकवणी देताना ते त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचाही खर्च उचलतात. ते इतके प्रसिद्ध आहेत की अनेक श्रीमंत घरातील मुलंही त्यांच्याकडे शिकवणी मिळावी म्हणून प्रयत्न करतात.

VIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम

First published: July 15, 2019, 8:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading