'सुपर 30'चं फर्स्ट लूक रिलीज, हृतिक रोशनचा वेगळा अवतार

'सुपर 30'चं फर्स्ट लूक रिलीज, हृतिक रोशनचा वेगळा अवतार

हृतिकने शिक्षक दिनाची संधी साधत त्याचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’चं फर्स्ट लुक प्रसिद्ध केलंय.

  • Share this:

मुंबई, 5 सप्टेंबर : बॉलिवूडचा डान्स किंग म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता हृतिक रोशनने आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. हृतिकने शिक्षक दिनाची संधी साधत त्याचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’चं फर्स्ट लुक प्रसिद्ध केलंय. त्याने सोशल मीडियावर हा फर्स्ट लूक शेअर केलं आहे. या पोस्टरवरून दिसून येतंय की या चित्रपटातील त्याचं पात्र हे त्याच्या इतर पात्रांपेक्षा वेगळं आहे.

बऱ्याच दिवसांपासून हृतिकचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट चर्चेचा विषय बनला होता. त्यातच भर टाकली ती कंगनाच्या मणिकर्णिकाने. हृतिकने आणि कंगना यांच्यात चित्रपटाच्या रिलीज डेटवरून वाद झाला होता. हृतिकचा हा चित्रपट आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. आनंद कुमार हे आयआयटीची तयारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना शिकण्यास मदत करतात. त्यांच्या या कार्यामुळे दरवर्षी अनेक मुलं आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ही एक गुरु शिष्याची कथा असल्याने चित्रपटाच्या टीमने  शिक्षक दिनाचा मुहूर्त साधत आज त्याचं  फर्स्ट लूक जाहीर केलं आहे.

हृतिकसोबत या पोस्टरमध्ये ३० मुलं दिसत आहेत. त्याचबरोबर या फोटोमध्ये ‘ अब राजा का बेटा राजा नही बनेगा... अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’ हे वाक्य दिसत आहे. आता या वाक्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की या चित्रपटात नेमकं काय असणार आहे. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा चित्रपट पाटण्यामध्ये  गरीब मुलांची फुकट  आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करून घेणाऱ्या आनंद कुमारच्या आयुष्यावर बेतलेला आहे. आनंद कुमारचे 465 विद्यार्थी 15 वर्षात आयआयटीमध्ये निवडले गेले.

समय बदल रहा है। Welcome to #Super30

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

युएस ओपन एंजाॅय करतायत प्रियांका-निक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 04:21 PM IST

ताज्या बातम्या