कंगनासोबत साखरपुडा झाल्याचा दावा खोटा-हृतिक

कंगनासोबत साखरपुडा झाल्याचा दावा खोटा-हृतिक

कंगनाने केलेल्या आरोपांबाबत हृतिक रोशनने अखेर आपलं मौन सोडलंय. सोशल मीडियावर आपली भूमिका मांडल्यानंतर त्याने न्यूज १८ नेटवर्कलाही मुलाखत दिलीय.

  • Share this:

09 आॅक्टोबर : कंगनाने केलेल्या आरोपांबाबत हृतिक रोशनने अखेर आपलं मौन सोडलंय. सोशल मीडियावर आपली भूमिका मांडल्यानंतर त्याने न्यूज १८ नेटवर्कलाही मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्याने आधी मांडलेलेच मुद्दे पुन्हा मांडले. कंगनाला एकांतात कधीही भेटलेलो नव्हतो. तसंच जानेवारी २०१४ साली माझा आणि तिचा पॅरिसमध्ये साखरपुडा झाल्याचा दावा तिने केला होता. मात्र पोलिसांकडे जमा केलेल्या माझ्या पासपोर्टमध्ये पॅरिसला गेल्याचा शिक्का नाहीये.

तो म्हणतो, एकीकडे मी माझे पुरावे पोलिसांकडे जमा केलेले असताना कंगनाने मात्र असं काहीही केलेलं नाही. आता तपाससत्र सुरू झालं असून ते कधी संपेल ते सांगता येणार नाही. मात्र या प्रकरणाचा माझ्या मुलांना त्रास होत असल्यानेच याबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपण पुढे आलो असल्याचं त्याने स्पष्ट केलंय.

First published: October 9, 2017, 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading