Home /News /entertainment /

जबरा फॅन ! चाहत्याने मुलाचं नाव ठेवलं हृतिक; कारण ऐकून चक्रावून जाल

जबरा फॅन ! चाहत्याने मुलाचं नाव ठेवलं हृतिक; कारण ऐकून चक्रावून जाल

हृतिक रोषनच्या (Hritik Roshan) एका चाहत्याने त्याच्या मुलाचं नाव हृतिक ठेवलं आहे. त्याला कारण ठरली आहेत, 6 बोटं.

    मुंबई, 24 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्यांचे देशातच नाही तर जगभरातही अनेक चाहते असतात. काही लोकं त्यांच्या नावामुळे प्रभावित होतात. अभिनेता हृतिक रोषनचाच एक चाहता आहे. त्याने त्याच्या मुलाचं नावही हृतिक ठेवलं आहे. याचं कारण ऐकून तुम्ही चक्रावून जाल. ऋषिकेश अंगोम या हृतिकच्या चाहत्याला मुलगा झाला. त्या मुलालाही हृतिकसारखीच 6 बोटं होती. त्यामुळे त्या चाहत्याने आपल्या मुलाचं नावंही हृतिक ठेवलं आहे. ऋषिकेश अंगोम या व्यक्तीने ट्विटरवर एक ट्वीटही केलं आहे. हृतिक जसा आपल्या नावाच्या पुढे H हे अक्षर लावतो, तसाच हा चाहताही आपल्या नावापुढे H हे अक्षर लावतो. आता त्याने आपल्या मुलाचं नाव हृतिक असं ठेवलं आहे. याबाबत सांगताना ऋषिकेश अंगोम म्हणाला, ‘माझ्या मुलाच्या जन्मानंतर त्याच्या एका हाताला सहा बोटं आहेत हे आमच्या लक्षात आलं त्यानंतर मी त्याचं नाव हृतिक ठेवण्याचा विचार पक्का केला.’ ऋषिकेश अंगोमने ट्वीट करत माहिती दिली की, ‘कहो ना प्यार है या चित्रपटानंतर मी हृतिकचा चाहता झालो. #BeautifullyImperfect’ ऋषिकेश अंगोमच्या या ट्वीटवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. त्याचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल होत आहे. आत्ता हृतिक रोषनने या ट्वीटवर काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या ट्वीटवर हृतिक काय प्रतिक्रिया देतोय हे याची वाट त्याचे चाहते बघत आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood, Hritik Roshan

    पुढील बातम्या