हृतिक करतोय बायोपिक 'सुपर 30'

हृतिक करतोय बायोपिक 'सुपर 30'

हा सिनेमा पटण्याच्या आनंद कुमारच्या आयुष्यावर आधारित आहे.

  • Share this:

07 जून : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा सपाटाच लागलाय. मग संजय दत्तच्या आयुष्यावरील बायोपिक असेल वा मनमोहन सिंग यांच्यावरील बायोपिक. यातच भर म्हणून आता  ह्रतिकही एक बायोपिक करतोय.हा सिनेमा पटण्याच्या आनंद कुमारच्या आयुष्यावर आधारित आहे.

या फिल्मचं नाव 'सुपर 30'. सुपर 30 ही आनंद कुमारची अभूतपूर्व आयडिया. दरवर्षी30 गरीब पण हुशार मुलांना निवडून आनंद त्यांची आयआयटी प्रवेश परीक्षेचं फुकट कोचिंग घेतो.हा प्रयोग त्याने 2002 साली सुरू केला.2008 साली त्याचे 30 ही विद्यार्थी  आयआयटीला निवडले गेले. हा चित्रपट त्याच्या या प्रयोगाच्या यशावर बेतला असेल.

या सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहेत.सध्या ह्रतिक या चित्रपटाची स्क्रीप्ट वाचतोय.

First published: June 7, 2017, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading