हृतिक रोशन आणि सुझान पुन्हा एकदा लग्नबंधनात, सूत्रांची माहिती

हृतिक रोशन आणि सुझान पुन्हा एकदा लग्नबंधनात, सूत्रांची माहिती

हृतिक रोशन आणि सुझान खान घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहेत. सुझान आणि हृतिकने त्यांच्या मुलांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

17 जानेवारी : हृतिक रोशन आणि सुझान खान घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहेत. सुझान आणि हृतिकने त्यांच्या मुलांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.तसंच दोघंही त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देऊ इच्छित असल्याचंही समजतंय.

हृतिक-सुझान हे घटस्फोट घेतल्यानंतरही बऱ्याचदा एकत्र वेळ घालवताना दिसत होते. पण आता पुन्हा एकदा हे दोघं लग्न करून एकत्र राहणार की नुसतेच एकमेकांचे मित्र बनून राहणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.

हृतिक आणि सुझाननं घटस्फोट घेतला चार वर्षांपूर्वी. 17 वर्षांचं नातं त्यांनी संपवलं. पण ते कागदपत्रांवर. कारण त्यानंतर ते एकमेकांच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहायचेच. मग कारण मुलांचं का असेना.  कंगना प्रकरण गाजलं तेव्हाही सुझान हृतिकच्या मागे उभी राहिली ठामपणे. त्यामुळे दोघांची तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना, अशी गत झालीय. त्यामुळे ते पुन्हा लग्न करणार असतील तर आश्चर्य वाटायला नको.

First Published: Jan 17, 2018 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading