S M L

कंगनाचं नाव न घेता सोशल मीडियावर हृतिकचे अनेक खुलासे

त्याने या पोस्टमध्ये कंगनाचं नाव न घेता अनेक मुद्दे मांडले आहेत. शिवाय त्याची बाजू मांडत मी या व्यक्तीला कधीच खासगीत भेटलो नसल्याचंही म्हटलं आहे.

Sonali Deshpande | Updated On: Oct 5, 2017 05:34 PM IST

कंगनाचं नाव न घेता सोशल मीडियावर हृतिकचे अनेक खुलासे

05 आॅक्टोबर : हृतिक कंगनाचा वाद संपतोय असं वाटताच नवीन ठिणगी उडते आणि पुन्हा एक नवं वळण या वादाला लागतंय. आता हा वाद पुन्हा चिघळलाय ते हृतिकच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे. नुकतंच हृतिकने ट्विटरवर गेले अनेक दिवस सुरू असलेल्या या सगळ्या प्रकरणावर त्याचं मत आणि स्पष्टीकरण दिलंय.

हृतिक म्हणतो, 'मी क्रिएटिव्हिटी, प्राॅडक्टिव्हिटी आणि कर्न्स्टक्टिव वर्क या मार्गानं जातो. ज्या गोष्टी याच्या पलीकडे आहेत. त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो.'

त्याने या पोस्टमध्ये कंगनाचं नाव न घेता अनेक मुद्दे मांडले आहेत.  शिवाय त्याची बाजू मांडत मी या व्यक्तीला कधीच खासगीत भेटलो नसल्याचंही म्हटलं आहे, तर 2014 साली या दोघांची एन्गेजमेन्ट झाल्याचं कंगनाचा म्हणणं हृतिकने तिला सिद्ध करण्यासही सांगितलंय. हे आणि अशा अनेक गोष्टींवर बोलून त्याने अखेर त्याचं मौन तोडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2017 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close