News18 Lokmat

44 वर्षांचा हृतिक मोठ्या पडद्यावर करणार 20 वर्षाच्या सारासोबत रोमान्स!

हृतिक रोशन आता चक्क सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणारे. साराला हृतिकसोबतच्या या पहिल्यावहिल्या सिनेमासाठी विचारण्यात आलं होतं आणि तिने हा सिनेमा करण्यास होकारही दिला असल्याचं समजतंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 29, 2018 11:54 AM IST

44 वर्षांचा हृतिक मोठ्या पडद्यावर करणार 20 वर्षाच्या सारासोबत रोमान्स!

29 जानेवारी : हृतिक रोशन आता चक्क सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणारे. साराला हृतिकसोबतच्या या पहिल्यावहिल्या सिनेमासाठी विचारण्यात आलं होतं आणि तिने हा सिनेमा करण्यास होकारही दिला असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे हृतिक ४४ वर्षांचा आणि सारा केवळ २० वर्षांची आहे.

सैफ अली खान आणि हृतिक रोशनने १६ वर्षांपूर्वी न तुम जानो ना हम या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिक आणि सैफ दोघेही इशा देओलच्या प्रेमात पडतात असे आपल्याला पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सैफ अली आणि हृतिकमध्ये चांगलीच मैत्री झाली होती. आता सैफच्या मुलीसोबत हृतिक एका चित्रपटात झळकणार आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात ती हृतिकची नायिका असणार आहे.

सारा खान धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येतायत. सारा अली खानला सुपर-३० या चित्रपटाची ऑफर आली. विशेष म्हणजे सारा आणि हृतिक यांच्यामध्ये जवळजवळ २४ वर्षांचे अंतर आहे. हृतिक हा ४४ वर्षांचा आहे तर सारा ही केवळ २० वर्षांची आहे. सैफ अली हृतिकपेक्षा केवळ तीन वर्षांनी मोठा आहे.

सुपर ३० या चित्रपटात हृतिक एका शिक्षकाची भूमिका साकारतोय.  या चित्रपटाच्या माध्यमातून  पहिल्यांदा हृतिक शिक्षकाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून या चित्रपटातील दुसऱ्या कलाकाराच्या कास्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. हृतिक यात गणिताचे जादूगार आनंद कुमार यांची भूमिका साकारतोय.

आनंद कुमार बिहारमध्ये 'सुपर ३०' नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामाअंतर्गत आनंद कुमार यांनी आतापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून निवडक ३० विद्यार्थी ते पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्याखाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी, भाऊ आणि आई मदत करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...