मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हृतिक रोशनच्या एक्स वाईफने सेलिब्रेट केला रुमर्ड बॉयफ्रेंडचा बर्थडे; फोटो झाला VIRAL

हृतिक रोशनच्या एक्स वाईफने सेलिब्रेट केला रुमर्ड बॉयफ्रेंडचा बर्थडे; फोटो झाला VIRAL

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता हृतिक रोशनची   (Hrithik Roshan)  एक्स वाइफ  (Hrithik Roshan Ex Wife)   सुजैन खान  (Sussanne Khan)  तिच्या खाजगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली चर्चेत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 19 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता हृतिक रोशनची   (Hrithik Roshan)  एक्स वाइफ  (Hrithik Roshan Ex Wife)   सुजैन खान  (Sussanne Khan)  तिच्या खाजगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली चर्चेत आहे. सुजैन खानबद्दल अशी चर्चा आहे की ती सध्या टीव्ही अभिनेता अली गोनीचा भाऊ   (Ali Goni Brother)  अर्सलान गोनीला   (Arslan Goni)  डेट करत आहे. अनेकवेळा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत.दोघंही अनेक कार्यक्रमात एकत्र असतात. इतकंच नव्हे तर नुकतंच दोघंही एकत्र गोव्याला सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा होत आहे. अर्सलान गोनीनं 19 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. ज्यामध्ये सुजैन खानची उपस्थिती खूप खास होती.

अर्सलान गोनीच्या बर्थडे पार्टीत सुजैन खानही उपस्थित होती. याशिवाय अनुष्का रंजन आणि तिचे काही जवळचे मित्रही या पार्टीचा सहभागी झाले होते. अनुष्का रंजननेही या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये सुजैन खान अर्सलान गोनीसोबत दिसत आहे.

दुसरीकडे सुजैन खानने अर्सलान गोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो या वाढदिवसाच्या पार्टीचा आहे. फोटोमध्ये सुजैन अर्सलान गोनीसोबत ब्लॅक टॉप आणि गोल्डन मिनी स्कर्टमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सुजैन खानने अर्सलान गोनीच्या वाढदिवसाची एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुजैननं लिहिलं आहे, 'हॅपी, हॅप्पी हॅप्पी बर्थडे.तुम्ही पात्र असलेलं ते आयुष्य तो आनंद तुम्हाला मिळो. तेजस्वी हास्य आणि खूप साऱ्या प्रेमासह मी शुभेच्छा देत आहे. मी पाहिलेली सर्वात मोठी ऊर्जा तुम्ही आहेत. तुम्ही नेहमीच असे कोणत्याही मर्यादेशीवाय चमकत राहा'. असं म्हणत सुजैननं आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचवेळी, अर्सलान गोनीनं इंस्टाग्रामवर त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सुजैन खान, अनुष्का रंजन, अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत पार्टी करताना दिसत आहे.

First published:

Tags: Entertainment, Hritik Roshan