घटस्फोटानंतर चार वर्षांनी हृतिकनं लिहिली सुझानला इमोशनल पोस्ट

घटस्फोटानंतर चार वर्षांनी हृतिकनं लिहिली सुझानला इमोशनल पोस्ट

बघता बघता हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटाला चार वर्ष झाली. दोघं वेगळे रहात असले तरी अनेकदा मुलांसाठी ते एकत्र बाहेर जातात.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : बघता बघता हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटाला चार वर्ष झाली. दोघं वेगळे रहात असले तरी अनेकदा मुलांसाठी ते एकत्र बाहेर जातात. मुलांना घेऊन फिरायला जातात. पालक म्हणून त्यांनी त्यांच्या कर्तव्यात अजून तरी काही कसूर केला नाहीय.


हृतिकनं नुकतीच सुझानसाठी एक पोस्ट इन्स्ट्रावर लिहिलीय. एका फोटोवर त्यानं लिहिलंय, ही माझी सर्वात जवळची मैत्रीण सुझान. ती माझ्या आणि आमच्या मुलांना कॅमेऱ्यात कैद करतेय.हा एक अनोखा क्षण आहे. माझ्या मुलांना यातून सांगितलं जातंय, तुमचे विचार वेगळे असू शकतात. पण तरीही तुम्ही एकत्र येऊ शकता.हृतिकची ही पोस्ट बरंच काही सांगून जाते. एक तर हृतिक आणि सुझान यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि ते दोघं पुन्हा संसार मांडू शकतात. दोघांना रिधान आणि रिहान दोन मुलं आहेत. मागे एकदा संजय खाननंही सांगितलं होतं की ते दोघं एकत्र येऊ शकतात. 14 वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी घटस्फोट घेतलाय.


Photos : 'मोगली'च्या प्रीमियरला अवतरले सेलिब्रिटी,पहा माधुरी, करिनाच्या अदाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 11:34 AM IST

ताज्या बातम्या