हृतिक साकारणार '...मेलुहा'च्या शंकराची भूमिका?

हृतिक साकारणार '...मेलुहा'च्या शंकराची भूमिका?

हा सिनेमा लेखक अमीश त्रिपाठी यांच्या 'द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा' या पुस्तकावर आधारित असेल.

  • Share this:

15 जुलै : दिग्दर्शक संजय लीला भंसाळींच्या पुढच्या सिनेमात हृतिक रोशन भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याचं बोलंल जातंय.

हा सिनेमा लेखक अमीश त्रिपाठी यांच्या 'द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा' या पुस्तकावर आधारित असेल. याआधीही करण जोहरला या पुस्तकावर आधारित सिनेमा बनवण्याची इच्छा होती.

या सिनेमातील भगवान शंकरांच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावंसुद्धा चर्चेत होती. मात्र ते काही जुळून आलं नाही आणि करणने माघार घेतली.

पण आता भंसाळींनी या पुस्तकाचे राइट्स विकत घेतले असून हृतिक या सिनेमासाठी होकार देणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलीये.

First published: July 15, 2017, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading