Super 30 स्टुडंटसोबत हृतिक रोशननं शेअर केला फोटो, म्हणाला...

Super 30 स्टुडंटसोबत हृतिक रोशननं शेअर केला फोटो, म्हणाला...

हृतिकच्या या फोटोला अवघ्या काही तासांमध्येच 8 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 जून : अभिनेता हृतिक रोशनचा सिनेमा 'Super 30' चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सिनेमात बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे. या सिनेमात हृतिकने गणित शिकवणारे शिक्षक आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ते दरवर्षी गरीब घरातील पण अभ्यासात हुशार अशा ३० मुलांची निवड करतात आणि त्यांना आयआयटीचं ट्रेनिंग देतात. त्यांना शिकवणी देताना ते त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचाही खर्च उचलतात. ते इतके प्रसिद्ध आहेत की अनेक श्रीमंत घरातील मुलंही त्यांच्याकडे शिकवणी मिळावी म्हणून प्रयत्न करतात.

बॉलिवूडचा ‘हा’ स्टार शुटिंग नसेल तर करतो शेती

सोशल मीडियावर हृतिकच्या या सिनेमाच्या ट्रेलरचं खूप कौतुक होत असून आतापर्यंत 30 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा सिनेमा पाहिला आहे. हृतिकनं नुकतीच या सिनेमात त्याच्या विद्यार्थ्यांची भूमिका साकारणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसोबत एक फोटो सोशल मीडियाव शेअर केला आणि यासोबत त्यानं एक भावूक पोस्टही लिहिली. हृतिकनं ऑनस्क्रीन विद्यर्थ्यांसोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, भूमिका शिक्षकाची होती मात्र मी या सेटवर एक विद्यर्थीच होतो.

ग्लॅमर सोडून आता प्रियांका चोप्रा करणार शेती? निकनं केला 'हा' खुलासा

हृतिकनं याच पोस्टमध्ये पुढे लिहिलं, हे आहेत माझे 'सुपर 30' त्यांची तपस्या, त्यांचे स्वभाव आणि उत्साह यातून मी बरंच काही शिकलो आहे. हृतिकच्या या फोटोला अवघ्या काही तासांमध्येच 8 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 'सुपर 30' मध्ये हृतिकसोबत टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूरही दिसणार आहे. मृणालनं या आधी काही मराठी सिनेमात आणि ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. 'सुपर 30' हा मृणालचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. याशिवाय या सिनेमामध्ये पंकज त्रिपाठी, नंदिश सिंह सिंधू, विरेंद्र सक्सेना आणि अमित साध या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

VIDEO- 'या' अभिनेत्रीच्या घरात घुसलं माकड, बेडरूममध्ये घातला हैदोस

First published: June 8, 2019, 10:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading