मुंबई, 26 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्यातला वाद वाढतच चालला आहे. याप्रकरणी आता क्राइम ब्रांचने हृतिक रोशनला समन्स बजावला (summoned) असून उद्या 27 फेब्रुवारी रोजी जाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. याप्रकरणी आता कंगनाने पुन्हा एकदा हृतिक रोशनला लक्ष्य केलं असून त्याच्यावर बोचरी टीका केली आहे. तिचं हे वादग्रस्त ट्वीट आता चांगलच व्हायरल होताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील प्रेमसंबंध प्रकरण आता जुनं झालं आहे. पण दोघांत प्रेमसंबंध असल्याची बाब हृतिकने नेहमी नाकारली आहे. तर दुसरीकडे कंगना रणौतने प्रेमप्रकरण असल्याचा दावा केला होता. यामुळे बॉलीवूड वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर हृतिकने असा दावा केला होता की, कंगना ज्या ई मेल आयडी शी बोलत होती. तो बनावट असल्याचा दावा हृतिकने केला होता. याप्रकरणी त्याने अज्ञात लोकांविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता.
तर कंगनाचे मते, संबंधित मेल आयडी स्वतः हृतिकने तिला दिला होता. ते दोघंही 2014 पासून यावर बोलत होते. त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं त्यानंतर कंगनाने अनेकदा हृतिक रोशनवर विविध प्रकारचे आरोप केले आहे. तिने बऱ्याच मुलाखतीत हृतिक रोशनचा अपमान करणारे शब्द वापरले आहेत. आता कंगनाने पुन्हा एकदा हृतिकला लक्ष्य केलं आहे.
Duniya kahan se kahan pahunch gayi magar mera silly ex abhi bhi waheen hai usi modh pe jahan yeh waqt dobara laut ke nahi jane wala ... 🙂 https://t.co/wEMxFCBK3n
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 26, 2021
हे ही वाचा -‘महिला कलाकारांनी माझं शोषण केलं’; अभिनेत्यानं सांगितला धक्कादायक अनुभव
तिने एक ट्वीट करून हृतिक रोशनला अपशब्द वापरले आहेत. यावेळी हृतिकला समन्स बजावल्याची बातमीला क्वोट करताना कंगनाने लिहिलं की, 'जग कुठून कुठे पोहचलं, तरी माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून तिथेच आहे. त्याच वळणावर आहे, ती पुन्हा फिरून येणार नाही.' तिचं हे ट्वीट चांगलचं व्हायरल होताना दिसत आहे. हृतिक रोशनने कंगना राणौतसोबत काइट्स आणि क्रिश- 3 हे दोन चित्रपट केले आहेत. हे चित्रपट करेपर्यंत दोघांत सर्वकाही ठिक होतं, पण एका मुलाखतीत कंगनाने हृतिक रोशनसोबत सुरू असलेल्या संबंधाची माहिती दिली. तिने हृतिक रोशन हा आपला जुना बॉयफ्रेन्ड असल्याची माहिती दिली. या दोन चित्रपटाच्या काळात आम्ही दोघांनी एकमेकांना डेट केल्याची माहितीही तिने दिली. यानंतर त्यांच्या दोघांतील वादाला सुरुवात झाली.