मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हृतिक रोशनच्या आलिशान घराची झलक, पाहा डोळे दिपवणारा Inside Video

हृतिक रोशनच्या आलिशान घराची झलक, पाहा डोळे दिपवणारा Inside Video

Hrithik Roshan Luxurious Home Video: बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा हिंदी चित्रपट सृष्टीतला एक यशस्वी अभिनेता आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याच्या घराची झलक दाखवली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 मार्च: बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा हिंदी चित्रपट सृष्टीतला एक यशस्वी अभिनेता आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक अप्रतिम सिनेमे केले आहे. त्याच्या चित्रपटाचे विषय नेहमीच हटके असतात. हृतिक केवळ एक पट्टीचा कलाकारच नाही, तर एक अप्रतिम डान्सर (Best Dancer) देखील आहे. त्याच्या डान्स मूव्ह्जने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. हृतिकला आतापर्यंत दोनदा फिल्मफेअर अवॉर्ड्स (Filmfare Awards) देखील मिळाला आहे. सर्व प्रकारच्या व्यक्तीरेखा साकारण्यात हृतिकचा हातखंडा आहे. त्याच्या अभिनयाप्रमाणे त्याचं घरही शानदार (Hrithik Roshan luxurious home) आहे. जगभरातील सिनेसृष्टीमध्ये एक हँडसम अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे.

हृतिक रोशनचं मुंबईतील जुहू भागात एक आलिशान घर आहे. हे घरातून हृतिकच्या व्यक्तीमत्वाची झलक प्रतिबिंबित होते. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिकचं हे आलिशान घर जवळपास 3000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं आहे. त्याच्या घरातील प्रत्येक भिंत आणि कोपरा हृतिकच्या पसंतीनुसारच डिझाइन केला गेला आहेत. त्याच्या या अलिशान घराची बऱ्याचदा चर्चा होतं असते. चाहत्यांमध्ये हृतिक ग्रीक गॉड नावानेही लोकप्रिय आहे. तो या नावाने का लोकप्रिय आहे, याच उत्तर आपल्याला त्याच्या घरातील उपलब्ध वस्तूतून मिळू शकतं.

" isDesktop="true" id="529356" >

ग्रीसमधील सँटोरीनी हे शहर पांढर्‍या आणि निळ्या वास्तूसाठी प्रसिद्ध आहे. ग्रीसमधील हे ठिकाण हृतिकचं सर्वात जास्त पसंतीचं ठिकाण आहे. त्यामुळे त्याच्या घरातील सजावटही निळा आणि पांढरा रंगात केली आहे. तसेच हृतिकला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्याची ही आवड जोपासण्यासाठी त्याने घरात एक मोठी लायब्ररी देखील तयार केली आहे.

हे ही वाचा - VIDEO : Hrithik Roshan शी केलं असभ्य वर्तन; अभिनेत्याचा संताप अनावर

याव्यतिरिक्त,  हृतिक रोशनने आपल्या आलिशान घरात आपलं एक ऑफिसही बनवलं आहे. ज्याची सजावट उच्च दर्जाची आहे. त्याच्या ऑफिसमध्ये सुंदर पेंटिंग्ज आणि लाकडी सजावटीचे तुकडे लावले आहे, ते आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे डोळे आकर्षित करतेच करते. तसेच अनेक दुर्मिळ आणि सुंदर दगडांच कोरीव कामही घरात केलं आहे. शिवाय हृतिकच्या घराच्या भिंतींवर अनेक मोटिव्हेशनल सुविचारही लिहिले आहेत. हृतिकच्या या आलिशान घरात तीन मास्क असलेला पियानो देखील आहे. हा पियाने स्वत: हृतिकने आणि त्याची दोन मुलं रिहान आणि रिदान यांनी तयार केला आहे. एकंदरीतच, हे आलिशान घर केवळ सुंदरच नाही, तर आरामदायक देखील आहे.

First published:

Tags: Bollywood News, Home-decor, Hritik Roshan, Star celebraties