हृतिक रोशनच्या सुपर 30 चं पोस्टर लाँच, या दिवशी रिलीज होणार ट्रेलर

हृतिक रोशनच्या सुपर 30 चं पोस्टर लाँच, या दिवशी रिलीज होणार ट्रेलर

सुरुवातील हा सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज होणार होता मात्र मणिकर्णिकामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 02 जून : अभिनेता हृतिक रोशनचा आगामी सिनेमा 'सुपर 30' वर झालेल्या अनेक वादांनंतर हा सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुरुवातील हा सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज होणार होता मात्र मणिकर्णिकामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. याशिवाय मीटू चळवळीमुळेही या सिनेमावर अनेक संकटं आली. पण आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी तयार आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विकास बहलनं सिनेमात कमबॅक केलं असून नुकतंच या सिनेमाचं पोस्टरही लाँच झालं आहे. यासोबतच हृतिकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटरून या सिनेमाच्या ट्रेलर लाँचचीही माहिती दिली आहे.

'सुपर 30' मध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या हृतिकनं त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये हृतिक पावसात भिजताना दिसत आहे. तर पोस्टरच्या खालच्या भागात काही विद्यार्थी मस्ती करताना दिसत आहेत. या पोस्टरला हृतिकनं, 'हकदार बना, सुपर 30चा ट्रेलर 4 जूनला येत आहे.' असं कॅप्शन दिलं आहे. या सिनेमाची रिलीज डेटही ठरली असून 12 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
वर्ल्ड कपसोडून बायकोसोबत ग्रीसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय हा क्रिकेटपटू

समीक्षक तरण आदर्श यांनी 'सुपर 30' च्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली. पण यादिवशीच सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीति चोप्रा यांचा 'जबरिया जोडी' हा सिनेमाही रिलीज होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कंगना रनौतचा मेंटल है क्या आणि सुपर 30 बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण वादापासून लांब राहण्यासाठी हृतिकनं त्याच्या सिनेमाची तारीख बदलली.
भाऊ अरबाजने तोडले होते सलमानचे दात, काय घडलं होतं नेमकं


टीव्ही मालिका 'नजर'मधील डायनच्या 'या' हॉट अदांनी तुम्हीही व्हाल घायाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 07:33 PM IST

ताज्या बातम्या