मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hrithik Roshanने aryan Khan साठी लिहिली खास पोस्ट; म्हणाला आयुष्य खूप विचित्र प्रवास आहे...

Hrithik Roshanने aryan Khan साठी लिहिली खास पोस्ट; म्हणाला आयुष्य खूप विचित्र प्रवास आहे...

अभिनेता हृतिक रोशनने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. हृतिकने आर्यनचा फोटो शेअर करत लिहिलं आहे.

अभिनेता हृतिक रोशनने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. हृतिकने आर्यनचा फोटो शेअर करत लिहिलं आहे.

अभिनेता हृतिक रोशनने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. हृतिकने आर्यनचा फोटो शेअर करत लिहिलं आहे.

  मुंबई, 7ऑक्टोबर- अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात(Drugs Case) अटक झाल्यानंतर मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात NCB ने ७दिवस आपल्या कस्टडीत ठेवलं आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार आर्यनच्या समर्थनासाठी धावले आहेत. सलमान खान, सुनील शेट्टीसह आता अभिनेता हृतिक रोशननेसुद्धा(Hrithik Roshan) आर्यनला पाठिंबा दिला आहे. हृतिकने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहीत आर्यनला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
  अभिनेता हृतिक रोशनने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. हृतिकने आर्यनचा फोटो शेअर करत लिहिलं आहे. 'प्रिय आर्यन आयुष्य एक खूपच विचित्र प्रवास आहे. मात्र ते उत्कृष्टसुद्धा आहे.कारण ते अनिश्चित आहे. आयुष्य हे खरंच उत्तम आहे कारण ते तुम्हाला गोलाकार परिस्थितीशी लढायला लावतो. पण देव खूप दयाळू आहे. तो फक्त कठीण आणि मजबूत खेळाडूंना खेळण्यासाठी कठीण चेंडू देतो.आपल्या सर्वानाच माहिती आहे या सर्व गोंधळात देव खेळण्यासाठी जेव्हा तुम्हाला निवडतो. तेव्हा तुम्ही मोठा दबाव अनुभवत असता.अशा परिस्थिती तुम्हाला राग,गोंधळ, असहाय्य्यता वाटणं अत्यंत साहजिक आहे. आणि एखाद्या हिरोला यातून बाहेर पाडण्यासाठी यासर्व गोष्टींची आवश्यकता असतेच. (हे वाचा:सेट तयार, व्हॅनिटी तयार मात्र, Shahrukhचा शेवटच्या क्षणी Ajay सोबत शुटिंगला नकार) मात्र तुम्ही सावध राहा कारण याच गोष्टी तुम्हाला जाळून राखसुद्धा करू शकतात. त्यामुळे स्वतःमध्ये करुणा, दयाळूपणा आणि प्रेम या गोष्टी ठेवून स्वतः ला जळण्याची परवानगी द्या. यश, अपयश, सुख,समाधान, चुका या सर्व गोष्टी समान आहेत. फक्त आपण ठरवायचं असतं की यातील कोणत्या गोष्टी आपण आपल्या जवळ ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी अनुभवातून दूर फेकून द्यायच्या. मात्र या सर्व गोष्टी शेवटी तुमच्याच आहेत. त्या सर्वांचे मालक व्हा. मी तुला लहानपनापासून ओळखतो. एक माणूस म्हणून मी ओळखतो तुला. विश्वास ठेव माझ्यावर जेव्हा तुम्हीच आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टींचे ठिपके एकत्र जोडाल तेव्हा त्या कलाकृतीला निश्चितच एक अर्थ प्राप्त होईल'. (हे वाचा:आर्यन खानसोबत दिसलेल्या BJP नेत्याचं स्पष्टीकरण, सांगितलं...) हृतिक पुढे लिहितो, ' जर तुम्ही या सर्व भावनारुपी राक्षसाला डोळ्यात डोळे घालून गप्प बसवला असाल. तर तुम्ही शांतच राहा त्याच निरीक्षण करा. तुमहाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की मिळेल. मात्र यासाठी आधी तुम्हाला शांत राहावं लागणार आहे. धैर्याने काम करावं लागणार आहे.तुझ्यासाठी खूप प्रेम'. अशी भली मोठी पोस्ट लिहीत हृतिक रोशनने आर्यन खानला दिलासा दिला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Hritik Roshan, Shahrukh khan

  पुढील बातम्या