अभिनेता हृतिक रोशनचे आजोबा जे. ओमप्रकाश यांचं निधन

ओमप्रकाश हे अभिनेता हृतिक रोशनचे आजोबा म्हणजेच हृतिकची आई पिंकी रोशन यांचे ते वडील होते.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 01:14 PM IST

अभिनेता हृतिक रोशनचे आजोबा जे. ओमप्रकाश यांचं निधन

मुंबई, 7 ऑगस्ट : प्रसिद्ध दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचं नुकतंच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी 'आखिर क्यूं', 'आप की कसम', 'आई मिलन की बेला', 'आया सावन झूम के', 'आए दिन बहार के', 'आदमी खिलौना है' सारख्या सुपरहीट सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. ओमप्रकाश हे अभिनेता हृतिक रोशनचे आजोबा म्हणजेच हृतिकची आई पिंकी रोशन यांचे ते वडील होते. अभिनेता दीपक पारशर यांनी आपल्या ट्विटर वरून ओमप्रकाश यांच्या निधनाची माहिती दिली.

दीपक पाराशर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'माझे लाडके अंकल श्री जे ओमप्रकाश यांचं 1 तासापूर्वीच निधन झालं. बॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांचे सिनेमा हे त्यांनी आम्हाला दिलेली  अमुल्य भेट आहे. काही महिन्यांपूर्वीच मी त्यांना भेटलो होतो. त्यावेळी मी हा फोटो काढला होता. ओम शांति' यासोबतच त्यांनी ओमप्रकाश यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला.

रामायणातील सीता माँ आता अशी दिसते, पाहा तिचे Latest Photo

हृतिकचं त्याच्या आजोबांशी खास बॉन्डिंग होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, 2016मध्ये त्यानं ओमप्रकाश यांना एक लक्झरी कार गिफ्ट दिली होती. काही दिवसांपूर्वीच सिनेमा 'सुपर 30'च्या प्रमोशन दरम्यान हृतिक त्याच्या आजोबांबद्दल बोलला होता. आजोबा ओमप्रकाश हेच आपले सुपर टिचर असल्याचं त्यानं म्हटलं होतं.

Article 370 वर तीनही खानांची 'अळीमिळी गुपचिळी'

अभिनेता दीपक पाराशर यांच्या व्यतिरिक्त सिने प्रदर्शकअक्षय राठी यांनी ओमप्रकाश यांच्या निधनानंतर ट्वीट करत दुःख व्यक्त केलं. त्यांनी लिहिलं, 'प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिने मेकर्स जे. ओमप्रकाश यांचं आज सकाळीच निधन झालं. देव त्यांच्या आत्म्याला शांति देवो. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याची शक्ती मिळो. राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांच्या दुःखात मी सहभागी आहे.'

हृतिकनं आजोबांच्या 91 व्या वाढदिवसाचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानं लिहिलं, 'माझे सुपर टिचर, माझे आजोबा ज्यांना मी प्रेमानं डेडा म्हणतो, त्यांनी मला आयुष्यातील प्रत्येक वळणावर खंबीरपणे चालायला शिकवलं. जे आता मी माझ्या मुलांना शिकवत आहे. त्यांनी मला माझ्या दुर्बलतेशी लढायला शिकवलं.'

'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत भर पावसात 'असा' रंगला विवाहसोहळा

====================================================================

VIDEO: पुरामुळे छतावर आली मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...