ह्रतिक पापड का विकतोय?

सायकल घेऊन जयपूरच्या रस्त्यावर अनेकांनी ह्रतिकला पापड विकताना पाहिलंय. पण मग तो पापड का विकतोय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 21, 2018 03:17 PM IST

ह्रतिक पापड का विकतोय?

21 फेब्रुवारी:  बॉलिवूडमधील हॅण्डसम हंक ह्रतिक रोशनचे पापड विकतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल  झाले आहेत. सायकल घेऊन जयपूरच्या रस्त्यावर  अनेकांनी ह्रतिकला पापड विकताना पाहिलंय. पण  मग तो पापड का विकतोय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

तर झालंय असं की ह्रतिकचा सुपर30 नावाचा  चित्रपट येतोय. हा चित्रपट पाटन्यामध्ये  गरिब मुलांची फुकट  आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करून घेणाऱ्या आनंद कुमारच्या आयुष्यावर बेतलेला आहे. आनंद कुमारचे 465 विद्यार्थी 15 वर्षात आयआयटीमध्ये निवडले गेले. तर त्याच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाचं शूटिंग सध्या ह्रतिक करतोय. त्यामुळे ह्रतिक खरंच पापड विकत नाहीये तर पापड विकण्याची अॅक्टिंग करतोय. पण तो पापड विकण्याचा अभिनय इतका सुरेख करतोय की लोकांना फरक कळंतच नाहीय.

या सिनेमाचं अर्धं शूटिंग वाराणसीमध्ये पूर्ण झालंय. तर उरलेलं लवकरंच पूर्ण होईल. आनंद कुमारच्या संघर्षपूर्ण यात्रेचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2018 03:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close