मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hrithik Roshan : भारताचा सुपरहिरो परतणार; हृतिक रोशनचा 'क्रिश 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Hrithik Roshan : भारताचा सुपरहिरो परतणार; हृतिक रोशनचा 'क्रिश 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Hrithik Roshan

Hrithik Roshan

ह्रितिक रोशनच्या प्रचंड गाजलेली क्रिश चित्रपटाच्या सिरीजमधील पुढचा भाग म्हणजेच 'क्रिश 4' हा चित्रपट येणाऱ्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची दाट शक्यता आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 16 ऑगस्ट: भारतातील प्रेक्षकांना एकेकाळी 'क्रिश' या सुपरहीरोने वेड लावले होते. क्रिश हा मेड इन इंडिया हिरोला प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. या  3 भाग प्रदर्शित झाले आहेत. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. पण चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता लवकरच क्रिश चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्रिश चित्रपटाचा नायक हृतिक रोशनने गेल्या वर्षी जूनमध्ये राकेश रोशनच्या 'क्रिश 4' ची अधिकृत घोषणा केली होती. तेव्हापासून या बहुप्रतीक्षित चित्रपटाची चर्चा सुरु होती. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असं दिसतंय. क्रिश ४ या चित्रपटावर काम सुरु झालं असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, क्रिश 4 ची कथा तिथून सुरू होईल जिथे क्रिश 3 चित्रपटाची कथा संपली होती. क्रिश 4 या चित्रपटाची कथा मागचे संदर्भ घेऊनच पुढे सुरु होईल, परंतु नवीन पात्रे आणि रोमांचक ट्विस्टसह हा चित्रपट पूर्णपणे वेगळा असेल.  राकेश रोशन या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत. हा सिनेमा अतिशय बिग बजेट असेल यात काही शंका नाही. हेही वाचा - Kiran Mane : 'माझ्याबाबतीतलं तिचं मत हलक्यात घेन्यासारखं नाय'; जुन्या वादावर पुन्हा व्यक्त झाले किरण माने या चित्रपटामध्ये असे  काही अ‍ॅक्शन सीक्वेन्स दाखवण्यात येतील असतील जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नाहीत. दरम्यान प्रसिद्ध  दिग्दर्शक राजेश रोशन यांनी क्रिश 4 च्या संगीताबद्दल एका मुलाखतीत सांगितले हते कि, “आम्ही अद्याप क्रिश 4 च्या संगीतावर काम सुरू केलेले नाही, परंतु अंतिम स्क्रिप्ट पूर्ण होताच आम्ही त्याला  सुरुवात करू.
तसेच त्यांनी स्पष्ट केले होते कि क्रिश ४ या चित्रपटात ह्रितिक किमान एक गाणे स्वतःच्या आवाजात गाणार आहे. दरम्यान, हृतिक रोशन येणाऱ्या काळात विक्रम वेधा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली होती. आता ह्रितिकला पुन्हा क्रिश म्हणून पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक झालेत.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Entertainment

पुढील बातम्या