मुंबई, 23 मार्च- बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राकेश रोशन यांनी सुरुवातीला अभिनेता म्हणून सर्वांचं मन जिंकलं आणि त्यांनंतर त्यांनी दिग्दर्शक-निर्माता बनून इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे. या अभिनेत्याने आपला मुलगा हृतिक रोशनला तर सुपरस्टार बनवलंच शिवाय अनेक नवोदित कलाकारांनाही रातोरात स्टार बनवलं आहे. राकेश रोशन यांनी 1970 मध्ये 'घर घर की कहानी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेता म्हणून त्यांनी पुष्कळ नाव कमावलं. त्यानंतर त्यांचा समावेश यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत झाला. राकेश रोशन 1970 ते 1989 या काळात चित्रपटांमध्ये दिसले होते. पण या दरम्यान त्यांना दिग्दर्शनात नशीब आजमवायचं होतं. त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकलं आणि त्यांना यशसुद्धा मिळालं.
राकेश रोशन यांनी 'खुदगर्ज' या पहिल्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्हीही बारकाईने चित्रपट पाहात असाल. आणि विशेष म्हणजे राकेश रोशन यांच्या चित्रपटांचे चाहते असाल, तर एव्हाना एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. ती गोष्ट म्हणजे दिग्दर्शक राकेश रोशन यांचे प्रत्येक चित्रपट फक्त K या नावाने सुरु होतात. यामागेसुद्धा एक रंजक कथा आहे आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांची श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा आहे . आपल्या सर्वांना माहिती आहे की, असे बरेच लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, त्यांचे चित्रपट, जेव्हा ते एका विशिष्ट तारखेला सुरु करतात किंवा प्रदर्शित करतात तेव्हा ते हिट किंवा सुपरहिट ठरतात. तसेच इंडस्ट्रीत असेही काही लोक आहेत ज्यांना त्यांच्या चित्रपटाच्या शीर्षकात एका विशिष्ट अक्षराची जोड हवी असते. यामध्ये अभिनेते-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या नावाचाही समावेश होतो.
राकेश रोशन यांच्या बहुतांश हिट चित्रपटांची नावे 'के' अक्षराने सुरु होतात. राकेश रोशन यांच्या बॅनरखाली बनलेल्या चित्रपटाचं नाव 'K' ने का सुरु होतं? हे जाणून घ्यायची अनेकांची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, 1984 मध्ये आलेल्या 'जाग उठा इंसान' या चित्रपटात ते व्यग्र होते. त्यावेळी त्यांच्या एका चाहत्याने त्यांना एक पत्र पाठवलं होतं. ज्यामध्ये त्यांना त्यांचे सर्व चित्रपट 'K ' अक्षराने सुरु करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर 1986 मध्ये 'भगवान दादा' रिलीज झाला आणि तोही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. मग राकेशला त्या पत्रावर विश्वास बसला. कारण त्यांचे 'K' पासून बनलेले 'खट्टा मीठा' आणि 'खानदान' सारखे चित्रपट हिट झाले होते, ज्यांच्या नावाची सुरुवात 'के' ने होती.तेव्हापासून राकेश यांनी 'K' पासून सिनेमांच्या नावाची सुरुवात करायला चालू केलं होतं.
सुरुवातीला राकेश रोशन यांच्या डोक्यावर भरपूर केस होते. मात्र जेव्हा ते दिग्दर्शक बनले तेव्हा त्यांनी टक्कल करायला सुरुवात केली. यामागचं कारण जाणून घ्यायचं आहे. जेव्हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्यांनी चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळावा आणि तो हिट ठराव यासाठी नवस मागितला होता. हा चित्रपट हिट झाल्यानंतर राकेश यांनी तिरुपतीला जाऊन आपलं मुंडन केलं होतं. त्याचवेळी राकेश यांनी अशी शपथ घेतली होती की आता ते परत कधीही डोक्यावर केस ठेवणार नाहीत आणि त्यामुळेच राकेश यांच्या डोक्यावर केस दिसून येत नाहीत .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment