घटस्फोटानंतरही हृतिकसोबत का राहतेय सुझान, स्वतःच सांगितलं या मागचं खरं कारण

घटस्फोटानंतरही हृतिकसोबत का राहतेय सुझान, स्वतःच सांगितलं या मागचं खरं कारण

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये त्याची एक्स वाइफ सुझान खान आपल्या मुलांसोबत हृतिकच्या घरी परत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत आहे. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये त्याची एक्स वाइफ सुझान खान आपल्या मुलांसोबत हृतिकच्या घरी परत आली आहे. याबाबत हृतिकचा आनंद तर सोशल मीडियावर सर्वांना पाहायला मिळत आहे. याशिवाय सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यानं सुझानचे आभार सुद्धा मानले आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुझानं याबाबात काही खुलासे केले आहेत.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सुझाननं हृतिकच्या घरी येऊन राहण्याच्या सकारात्मक बाजू मांडल्या. सुझाननं तिची ही मुलाखत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'तुमचं सर्वोत्कृष्ट काम तेच असेल जे तुम्ही घराच्या चार भिंतीच्या आत कराल.'

राणा दग्गुबती लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?

सुझाननं पुढे लिहिलं, जेव्हा COVID-19 या आजाराचे गंभीर परिणाम समोर आले आणि हे रोखण्यासाठी लॉकडाऊन केलं जाणार आहे याची घोषणा झाली त्यावेळी मी आणि हृतिकनं ठरवलं होतं की आम्ही या काळात आपल्या मुलांसोबत एकत्र राहायला हवं. त्यावेळी आम्ही या लॉकडाऊनमध्ये एका घरात राहायचा निर्णय घेतला आणि आमच्या लॉकडाऊनची सुरुवात केली.

सुझान खाननं या मुलाखतीत जे मुद्दे मांडले त्यावर तिला सोशल मीडियावरून पाठिंबा दिला जात आहे. सोशल मीडियावर कमेंट करताना सर्वजण सुझानचं कौतुक करताना दिसत आहे. या मुलाखतीत चाहत्यांसाठी तिनं खास मेसेज दिला आहे. ज्यात तिनं लिहिलं, हा आपल्या सर्वांसाठी एक वेकअप कॉल आहे. ही अशी वेळ आहे ज्यात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या आपलं बॉन्डिंग आणखी घट्ट करू शकतो. चांगल्या आठवणी तयार करू शकतो'

ब्रेकअप के बाद! 6 वर्षांचं नातं तुटल्यावर अभिनेत्रीनं सांगितलं रिलेशनशिपचं सत्य

First published: May 13, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या