Home /News /entertainment /

VIDEO: 'त्या' मुलीच्या हातात-हात घालून फिरताना दिसला Hritik Roshan, नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

VIDEO: 'त्या' मुलीच्या हातात-हात घालून फिरताना दिसला Hritik Roshan, नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

Hritik Roshan

Hritik Roshan

बॉलीवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hritik Roshan ) नेहमी या ना त्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. दरम्यान, हृतिक रोशन हॉटेलबाहेर एका मुलीसोबत स्पॉट झाला आहे.

  नवी दिल्ली, 29 जानेवारी: बॉलीवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hritik Roshan ) नेहमी या ना त्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. दरम्यान, हृतिक रोशन हॉटेलबाहेर एका मुलीसोबत स्पॉट झाला आहे. त्याचा मुलीसोबतचा हातात हात धरलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. योगेन शाह या फोटोग्राफरने आपल्या इंस्टाग्रामवर हृतिक रोशनचा (Hritik Roshan) एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने एका मुलीचा हात पकडला असून तो एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. हृतिक तिचा हात पकडून तिला त्याच्या गाडी जवळ घेऊन जातो आणि गाडीत बसून तिला सोबत घेऊन जातो. या व्हिडीओत हृतिकने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by yogen shah (@yogenshah_s)

  हृतिक आणि त्यासोबत असलेल्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर अखेर ही मुलगी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, हृतिक सगळ्यात शेवटी ‘वॉर’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर दिसले होते. आता तो ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत दीपिका पदूकोण दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एका चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट विक्रम वेधा या चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटात सैफ अली खानसुद्धा दिसणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Hritik Roshan

  पुढील बातम्या