मुंबई, 10 जानेवारी : बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून ज्या अभिनेत्याला ओळखलं जातं तो म्हणजे ऋतिक रोशन. ऋतिकची सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॅन फॉलोविंग आहे. ऋतिक त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातोच मात्र त्याचे लुक्स आणि कामासाठी तो घेत असलेल्या मेहनतीसाठीही तो ओळखला जातो. ऋतिक आज एका सिनेमासाठी करोडो रुपये घेतो पण अभिनेत्याला त्याचा पहिल्या सिनेमासाठी मिळालेले पैसे ऐकून तुम्हीही अवाक व्हाल. ऋतिक रोशन आज त्याचा 49वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्तानं ऋतिकच्या पहिल्या मानधनाविषयी जाणून घेऊया.
अभिनेता ऋतिक रोशननं बालकलाकार म्हणून कामाला सुरूवात केली होती. वयाच्या 6व्या वर्षी त्यानं आशा पारेख यांच्या आशा सिनेमात काम केलं. यात त्याला केवळ जितेंद्रच्या पाया पडायचं होतं. ही छोटीशी भूमिका देखील त्यानं चांगली वठवली आणि तिथून त्याच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
हेही वाचा - Mission Majnu Trailer : नॅशनल क्रश करणार बॉलिवूड हिरोबरोबर रोमान्स; रश्मिका मंदानाचं हिंदी ऐकलत का?
आशा सिनेमात जितेंद्रच्या पाया पडण्यासाठी ऋतिकनं काम केलं. त्याच्या या कामासाठी त्याच्या आजोबांकडून त्याला 100 रुपये मानधन म्हणून देण्यात आले. 1980मध्ये 100 रुपये ही किंमत खूप जास्त होती. ऋतिकला हे पैसे मिळाले तेव्हा त्यानं या पैशातून खेळण्यातील 10 हॉट व्हिल कार खरेदी केल्या. ऋतिक तेव्हा फार लहान होता पण त्याला कारचं भयंकर वेड होतं.
बालकलाकर म्हणून ऋतिकनं अनेक सिनेमात कामं केली. 'भगवान दास', 'आसपास', 'आप के दिवाने' सारख्या अनेक सिनेमात त्यानं काम केलं. 3-4 सिनेमांनंतर तो अनेक वर्ष सिनेमात दिसला नाही. या काळात ऋतिकनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि 1980 नंतर जवळपास 20 वर्षांनी 'कहोना प्यार हैं' सारख्या एका ब्लॉकबस्टर सिनेमातून डेब्यू केला. या सिनेमानंतर ऋतिकला पुन्हा मागे वळून पाहावं लागलं नाही. पहिल्या कामासाठी 100 रुपये मानधन घेणारा ऋतिक आज 100 करोडहून अधिक पैसे कमावतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News