• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ते आव्हान जितेंद्र यांना पडलं भारी; हृतिक आणि एकतामध्ये झालं होतं भांडण

ते आव्हान जितेंद्र यांना पडलं भारी; हृतिक आणि एकतामध्ये झालं होतं भांडण

तिनं आपल्या डान्सचा जलवा दाखवण्यासाठी चक्क हृतिक रोशनला (Hrithik Roshan) आव्हान दिलं होतं. पण त्यावेळी असं काही घडलं की ज्यामुळं जितेंद्र कोंडीत सापडले होते.

 • Share this:
  मुंबई 9 मे: एकता कपूर (Ekta Kapoor) हिला छोट्या पडद्यावरील क्वीन असं म्हणतात. तिनं आजवर अनेक सुपरहिट मालिकांची निर्मिती केली आहे. परंतु खरं तर तिला लहानपणापासून अभिनेत्री होण्याची इच्छा होती. यासाठी तिनं डान्सचं प्रशिक्षण देखील घेण्यास सुरुवात केली होती. अन् एकदा तर तिनं आपल्या डान्सचा जलवा दाखवण्यासाठी चक्क हृतिक रोशनला (Hrithik Roshan) आव्हान दिलं होतं. पण त्यावेळी असं काही घडलं की ज्यामुळं जितेंद्र कोंडीत सापडले होते. पाहूया काय होता तो भन्नाट किस्सा. एकताचा 11 वा वाढदिवस होता. संध्याकाळी वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींची मुलं आली होती. या पार्टीत हृतिक रोशन देखील आला होता. हृतिक आणि एकताचं फारसं चांगलं जमत नसे दोघांमध्ये सतत भांडणं होत असतं. पण त्या भांडणाचं कारण त्यादिवशी सर्वांना कळालं. एकतानं हृतिकला डान्ससाठी आव्हान दिलं. हृतिक लहानपणापासूनच एक उत्तम डान्सर आहे. यापूर्वी त्यानं अनेक स्पर्धा देखील जिंकल्या होत्या. त्यामुळं त्यानं लगेच आव्हान स्विकारलं. दोघांनी डान्स करण्यास सुरुवात केली. एकता जाड असल्यामुळं तिचा डान्स पाहून सर्व मुलं तिला हसू लागली. तर दुसरीकडे सर्वांनी हृतिकच्या डान्सचं कौतुक केलं. अर्थात हे कौतुक एकताला आवडलं नाही. शिवाय त्या स्पर्धेचं बक्षिस जितेंद्र यांनी हृतिकला दिलं. त्यामुळं एकता वडिलांवर खुप नाराज झाली होती. ‘महाराष्ट्राकडून काहीतरी शिका’; जावेद अख्तर यांचा केंद्राला टोला “माझा वाढदिवस, माझी पार्टी, आणि बक्षिस त्याला हे चूक आहे.” असं म्हणत ती वडिलांवर नाराज झाली होती. त्यावेळी जितेंद्र खऱ्या अर्थानं कात्रीत सापडले होते. एकताच कौतुक करावं की हृतिकचं हा प्रश्न त्यांना पडला होता. हा गंमतीशीर किस्सा त्यांनी द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला होता. हा किस्सा ऐकून सर्व प्रेक्षकांनी एकच हास्य कल्लोळ केला होता.
  Published by:Mandar Gurav
  First published: