Home /News /entertainment /

Shah Rukh Khan ला घाबरला हृतिक रोशन? अचानक बदलला हा महत्वाचा निर्णय

Shah Rukh Khan ला घाबरला हृतिक रोशन? अचानक बदलला हा महत्वाचा निर्णय

या सिनेमामध्ये दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन (Deepika Padukone and Hrithik Roshan) अशी नवी जोडी दिसणार आहे. या दोघांनी याआधी एकत्र काम केलं नाही आहे. त्यामुळे या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

    मुंबई, 11 मार्च: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' (Shah Rukh Khan Pathan) हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टीजर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. शाहरुखच्या या नव्या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) असं जबरदस्त त्रिकुट या सिनेमात दिसणार आहे. दरम्यान पठाणची रीलिज डेट समोर आल्यानंतर हे स्पष्ट झालं होतं की, या सिनेमाटी टक्कर हृतिक रोशनच्या 'फायटर' (Hrithik Roshan Fighter) या सिनेमाशी होईल. कारण अशी माहिती समोर आली होती की हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. मात्र आता ही तारीख बदलली आहे. सिनेमात देखील दीपिका आहे. मीडिया अहवालांनुसार, बिग बजेट सिनेमांचा मेगाक्लॅश टाळण्यासाठी फायटरच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. हे वाचा-सर्वच चित्रपटांची खिल्ली उडवणाऱ्या KRK ने दिला प्रभासच्या Radhe Shyamचा रिव्ह्यू दरम्यान फायटर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हृतिक-दीपिकाचा 'फायटर' 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.  फायटच्या मेकर्सनी नव्या रीलिज डेटची घोषणा करणारा नवा प्रोमो जारी केला आहे. हृतिक रोशनने देखील या सिनेमाचा प्रोमो शेअर केला आहे. पाहा Pathaan चा टीजर Pathaan सिनेमात दीपिका पादुकोण आणि शाहरुख यांच्यासह जॉन अब्राहम देखील आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद या दिग्दर्शकाने केले आहे. फायटरमध्ये दिसणार नवी जोडी या सिनेमामध्ये दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन (Deepika Padukone and Hrithik Roshan) अशी नवी जोडी दिसणार आहे. या दोघांनी याआधी एकत्र काम केलं नाही आहे. त्यामुळे या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र आता सिनेमाच्या नव्या रीलिज डेटमुळे चाहत्यांना आणखी काही महिने या सिनेमासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा सिनेमा एक अॅक्शन मुव्ही असणार आहे, ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. ही जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचून आणणारी ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Hritik Roshan, Shah Rukh Khan

    पुढील बातम्या