हृषिकेश जोशी घेऊन येतोय 'होम स्वीट होम'

हृषिकेश जोशी घेऊन येतोय 'होम स्वीट होम'

अभिनेता हृषिकेश जोशी आता दिग्दर्शनात पदार्पण करतोय. होम स्वीट होम हा त्याचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा येत्या 28 सप्टेंबरला भेटीला येतोय.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : अभिनेता हृषिकेश जोशी आता दिग्दर्शनात पदार्पण करतोय. होम स्वीट होम हा त्याचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा येत्या 28 सप्टेंबरला भेटीला येतोय. विशेष म्हणजे यात दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनीही काम केलंय.त्यामुळे रिमाजींच्या चाहत्यांना त्यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहता येईल. यासोबत मोहन जोशी, स्पृहा जोशी आणि हृषिकेश स्वत: यात काम करत आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये वैभव जोशी यांची कविता आणि त्यांचा आवाज वापरण्यात आलाय. कवीचा आवाज एखाद्या टीझरमध्ये वापरण्याचा हा प्रयोग मराठीत अनोखा मानला जातोय.

सिनेमाच्या टीझरमध्ये छान कविता आहे. मनातल्या घराचं वर्णन आहे. 'दार, उंबरा, कुंपण,अंगण इतक्याच जागेत मावतो आपण' अशा ओळी असलेली ही कविता खूपच अर्थपूर्ण आहे.

हेही वाचा

LIVE UPDATE : माथेफिरू तरुणाने लग्नासाठी तरुणीला केलं बंदी

प्रियांका चोप्राचं न्यूयॉर्कमधलं आलिशान घर पाहिलंत का?

सोशल स्टार प्रिया वारियरला जाहिरातींच्या बंपर ऑफर्स, एका जाहिरातीसाठी मिळणार...

First published: July 13, 2018, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading