'हृदयांतर'ची मेलर्बन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

'हृदयांतर'ची मेलर्बन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

मेलर्बनमध्ये आयोजित होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'हृदयांतर'चा वर्ल्ड प्रीमियर होणारे.

  • Share this:

03 जुलै : विक्रम फडणवीस दिग्दर्शित 'हृदयांतर' सिनेमाची निवड यंदाच्या मेलर्बनमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आलीय. मेलर्बनमध्ये आयोजित होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'हृदयांतर'चा वर्ल्ड प्रीमियर होणारे.

मेलर्बनमध्ये होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये माझ्या सिनेमाचं सादरीकरण करण्यासाठी  मी फारच उत्सुक असल्याचं विक्रम फडणवीस यांनी म्हटलंय. कौटुंबिक जिव्हाळ्यावर आधारित असलेल्या या सिनेमात सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसतील.

या सिनेमात हृतिक रोशनचीही छोटी भूमिका आहे. 7 जुलैला हृदयांतर रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 02:35 PM IST

ताज्या बातम्या