Home /News /entertainment /

ओम-स्वीटूच्या प्रेमाचा 'असा' होणार THE END; ‘येऊ कशी तशी..' मालिकेत पुन्हा नवा TWIST

ओम-स्वीटूच्या प्रेमाचा 'असा' होणार THE END; ‘येऊ कशी तशी..' मालिकेत पुन्हा नवा TWIST

सध्या सोशल मीडियावर 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेची जोरदार चर्चा आहे. या मालिकेत ओम आणि स्वीटू यांच्या लग्न विशेष भागानंतर एक विलक्षण वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. ओम आणि स्वीटू आता एकत्र येणार का, यांचे प्रेम जिंकणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 सप्टेंबर 2021 ; सध्या सोशल मीडियावर 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेची जोरदार चर्चा आहे. कारणही तसेत आहे. काही दिवसापूर्वी या मालिकेत मोठी घडामोड घडली आणि मालिकेचा संपूर्ण (Yeu Kashi Tashi Mi Nandayla Twist) चेहरा बद्दलून गेला. या मालिकेत ओम आणि स्वीटू यांच्या लग्न विशेष भागानंतर एक विलक्षण वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाल्यानंतर या मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल झाली आणि अजूनही होत आहे. प्रेक्षक या लग्नामुळे नाराज झाले आहेत. त्यांना ओम आणि स्वीटू यांना एकत्र बघायचे आहे. लग्नानंतर स्वीटू मोहितसोबत ओमच्याच घरात राहत आहे. स्वीटूला हे लग्न मान्य नाही तरी देखील घरच्यांसाठी सर्व काही ठीक असल्याचे भासवत आहे. ओम लग्नाच्या दिवशी कोठे होता याचे खरे कारण स्वीटूला माहित नाही. तर दुसरीकडे ओमसुद्धा स्वीटूच्या प्रेमाखातर तिला हे सत्य कळू देत नाही आहे. मात्र आता लग्नाच्या दिवशी जे काही घडले त्याची कारण स्वीटूला समजणार आहेत. सगळ्या गोष्टी समजल्यानंतर स्वीटू कशी काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. स्वीटू प्रेमाखातर ओमच्या आयुष्यात परतणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. वाचा : Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या चावडीवर मीराला मांजरेकरांनी दिला समजचा डोस; तर दादूसला मिळाली शाब्बासकी! प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारण मालिकेत एका नव्या चेहऱ्याची म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे हिची एंट्री झाली आहे. अभिनेत्री प्रिया मराठे या मालिकेत सकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. आता हीच ओम आणि स्वीटूला त्यांचे प्रेम परत मिळवून देणार आहे. त्यासाठी ती प्रयत्न देखील करत आहे. मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. यानंतर पुन्हा स्वीटू आणि ओम हे लव्हबर्ड एकत्र येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. स्वीटू ओमसह लग्न करत सुखाचा संसार थाटणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. अशाप्रकारे मालिकेचा हॅप्पीवाल एंडिग होणार आहे. त्यामुळे मालिकेतील येणारा प्रत्येक भाग रंजक वाढविणार असणार आहे. तसेच या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Marathi entertainment, Zee Marathi

    पुढील बातम्या