Home /News /entertainment /

आता बेबो शिकवणार कपडे कसे धुवायचे? करीना कपूरचे आगळेवेगळे कोचिंग क्लासेस

आता बेबो शिकवणार कपडे कसे धुवायचे? करीना कपूरचे आगळेवेगळे कोचिंग क्लासेस

कोरोना रुग्णांचे कपडे कसे धुवायचे? किंवा कुठली काळजी घ्यायची? याबाबत महत्वाची माहिती आपल्या चाहत्यांना देत आहे. (How to wash clothes)

    मुंबई 22 मे: कोरोनामुळं देशवासीयांवर मोठं संकट कोसळलं आहे. (Coronavirus) लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकजण आपापल्या परीनं संकटात अडकलेल्या नागरिकांना मदत करत आहेत. या मदत कार्यात आता अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिनं देखील भाग घेतला आहे. ती कोरोना रुग्णांचे कपडे कसे धुवायचे? किंवा कुठली काळजी घ्यायची? याबाबत महत्वाची माहिती आपल्या चाहत्यांना देत आहे. (How to wash clothes) करीनानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन त्याद्वारे तिनं ही माहिती दिली. “कोरोनाबाधित रुग्णांचा टॉवेल, चादर स्वतंत्र धुवावी आणि हे कपडे हाताळताना जाड हॅण्डग्लोव्ज घालावेत. 60 ते 90 अंश तापमानात डिटर्जंटने हे कपडे धुवावेत किंवा कपडे गरम पाण्यात भिजवून ठेवावेत, यावेळी एखाद्या काठीचा वापर करावा. हे करताना पाणी उडू नये याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करणे टाळावा. त्याच्या कपड्यांचं पाणी गळणार नाही याची काळजी घ्यावी. किवा दुसऱ्या एखाद्या वेगळ्या भांड्यात ठेवावेत. कपडे धुताना जर गरम पाणी नसेल तर क्लोरिन टाकून अर्धा तास कपडे भिजत ठेवल्यानंतर ते स्वच्छ पाण्यात कपडे घुसळून उन्हात वाळवा. शेवटी सर्व काम झाल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा” अशी माहिती तिनं या पोस्टमध्ये दिली आहे. दुसऱ्या बाळाच्या संगोपनात व्यस्त असल्यामुळं करीना कपूर सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र तिच्या चाहत्यांना दिर्घ काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण लवकरच ती आमिर खानच्या लाल सिंग चढ्डा या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. कोरोनामुळं हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होईल.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Coronavirus, Kareena Kapoor, Video

    पुढील बातम्या