• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 1 मिनिटांत पोट कसं कराल कमी? राखी सावंतने चाहत्यांना दिल्या खास टिप्स

1 मिनिटांत पोट कसं कराल कमी? राखी सावंतने चाहत्यांना दिल्या खास टिप्स

जर तुमचं पोट बाहेर असेल तर मी फोटो काढणार नाही असा इशारा देखील तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

  • Share this:
    मुंबई 7 ऑगस्ट: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यामुळे अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी पोट कमी करण्याचा सोपा उपाय सांगताना दिसत आहे. (Rakhi Sawant video viral) शिवाय जर तुमचं पोट बाहेर असेल तर मी फोटो काढणार नाही असा इशारा देखील तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे. राखीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता राखीला तिच्यासोबत फोटो काढण्याची विनंती करतो. राखी फोटोसाठी तयार झाली. मात्र तिने त्याच्या वाढलेल्या फोटोची खिल्ली उडवली. त्यानंतर जर तुझं पोट आता गेलं नाही तर मी फोटो काढणार नाही असा इशारा त्याला. त्या चाहत्याने देखील प्रामाणिक प्रयत्न केला परंतु त्याला पोट आत घेणं जमत नव्हतं. अशा वेळी स्वत: राखीने काही मिनिटांत पोट आत घेण्याचं टेकनिक त्याला दिलं. देवमाणूस: चंदाच्या हाती लागणार वाड्यातील डेड बॉडीज; अखेर डॉक्टरचा होणार पर्दाफाश
    View this post on Instagram

    A post shared by Voompla (@voompla)

    राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. 1997 साली 'अग्निचक्र' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला. किंबहूना तिच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे बॉलिवूडची नवी आयटम गर्ल म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला 50 रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: