मुंबई, 28 ऑक्टोबर: कालिन भैया उर्फ पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी या एका दशकात अनेक प्रभावी भूमिका साकारल्या. गँग्स ऑफ वासेपुरमधील कसाई, नील बट्टे सन्नाटामधील शाळेचे प्रामाणिक मुख्याध्यापक, न्यूटनमधील व्यावहारिक पण कर्तव्यदक्ष सीआरपीएफ अधिकारी, बरेली की बर्फी आणि गुंजन सक्सेना- द कारगिल गर्लमधील उदारमतवादी वडिलांची भूमिका आणि स्त्री चित्रपटामधील 'कमाल' पुस्तक विक्रेता. अशा अनेक भूमिकांतून त्यांनी आपल्यातील एक निपुण कलाकार फॅन्ससमोर आणला आहे. पण मिर्झापूर (Mirzapur) या वेब सिरीजने प्रेक्षकांना 'कालीन भैय्यां'च्या अभिनयाची आणि भूमिकेची दखल घ्यायलाच लावली आहे. सिरीजमधील त्रिपाठी यांचा अभिनय प्रेक्षकांना इतकं भावलाय की आता फॅन्स सोशल मीडियावर त्यांच्या उल्लेख कालीन भैय्याच्या नावाने करू लागले आहेत.
"मी अनेक वर्षांपासून अशाच प्रकारचे अभिनय करत आहे. त्यामुळे याच पात्रात फॅन्सना नेमके काय आवडले हे मला ठाऊक नाही," अशी नम्र प्रतिक्रिया पंकज यांनी दिली आहे.
'आपला प्रोजेक्ट कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे आणि त्या विशिष्ट व्यासपीठाची पोहोच काय आहे यावर देखील अवलंबून आहे. प्रकल्पाचे संपूर्ण पॅकेजिंग, त्याचं मार्केटिंग एखादी भूमिका विस्तृतपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम बजावते. परंतू प्रामाणिकपणे सांगायंच तर, माझ्या विशिष्ट पात्राने इतरांपेक्षा अधिक चाहते का मिळवले याबद्दल मी खरोखर विश्लेषण करू शकत नाही. प्रेक्षक एखाद्या विशिष्ट अभिनेत्यावर प्रेम का करतात याबद्दल तर्काने खरोखरच पाहिलं पाहिजे असं मला वाटत नाही', असे ते म्हणाले.
(हे वाचा-मराठीविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कुमार सानूंच्या मुलाविरोधात मनसे आक्रमक)
'कालीन भैय्या' हे पात्र फार रंजक आहे. हिंदी सिनेमातील टिपिकल माफियांप्रमाणे नसून कालीन भैय्या हे पहिल्यांदा वडील आणि नंतर बाहुबली आहेत. पण जेव्हा ते बाहुबली झोनमध्ये जातात तेव्हा अशा गोष्टी करण्यास ते सक्षम आहेत ज्याची कल्पना आपण केवळ आपल्या भयानक स्वप्नांमध्येच करू शकतो.
मिर्झापूर 2 (Mirzapur 2) च्या शूटिंगच्या वेळेचा एक किस्सा सांगताने ते म्हणाले की, 'मिर्झापूर 2 च्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी माझे दिग्दर्शक गुरमीत सिंग हे मला म्हणाले, पंकजजी तुम्ही पहिल्या सिझनमध्ये असं करत नव्हता. त्यांना मी याचा अर्थ विचारल्यावर ते म्हणाले की पहिल्या सिझनमध्ये कालीन भैय्या एखाद्याच्या कल्पनेशी सहमत आहेत की नाही हे प्रेक्षकांना कळायचंच नाही. त्यांची व्यक्तिरेखा इतकी लहरी होती की मुन्नाची कल्पना ही त्यांना आवडली की नाही हे कोणालाही कळू शकलं नाही. पण या वेळेस तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या चेहऱ्यावर मनातल्या भावना दर्शवत आहात.'
(हे वाचा-Naagin4 च्या शूटवेळी प्रेग्नेंट होती अनिता, शेअर केला Baby Bump चा फोटो)
पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले की या सर्व गोष्टी स्क्रीप्टमध्ये नव्हत्या, तेव्हा गुरुने पहिल्या सीझनमधील एक सीन त्यांना दाखवला. तेव्हा पंकज यांना त्यांच्या म्हणजे कालीन भैयाच्या चरित्रातील गुण वैशिष्ट्यं आणि व्यक्तिमत्त्वातील पैलू सापडले.
त्रिपाठी पुढे म्हणाले की, एखाद्या भूमिकेच्या तयारीसाठी अभिनेत्याला 2-3 महिने लागू शकतात पण त्याचा एकूणच आयुष्याचा अनुभव त्या तयारीत आपोआप भर घालतो. परंतु, त्यांनी असंही म्हटले की सह-कलाकाराच्या आयुष्यातील अनुभवांच्या अभावामुळे त्यांना मदत केली पाहिजे. पंकज त्रिपाठी असे म्हणाले की, ' मी 45 वर्षांचा आहे. एखाद्या विशिष्ट भूमिकेच्या तयारीसाठी मला 2-3 महिने लागले तर अभिनेता म्हणून माझी 45 वर्षांच्या तयारीची यात भर पडते'. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी असे म्हटले आहे की कदाचित तुमच्या सहकलाकाराचा अनुभव कमी असेल, त्याचा कामाचा पहिलाच दिवस असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे. त्यांनी असे म्हटले की, 'माझ्यासाठी ती व्यक्ती सहकलाकार होण्यापूर्वी एक मनुष्य, एक बॉक्स आहे जो स्वप्नांनी परिपूर्ण आहे, जो पहिल्यांदाच उघडला आहे. म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं संरक्षण केलं पाहिजे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे.'