मुंबई, 10 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Reah Chakravarthy) हिची सातत्याने ED च्या टीमकडून चौकशी केली जात आहे. सोमवारी तिला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले. यापूर्वी शुक्रवारी तिला ईडीच्या कार्यालयात तब्बल 11 तास होती. यादरम्यान तपास एजंसीकडे रियाच्या उत्पन्नाबाबत मोठी माहिती हाती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने उत्पन्नाबाबत जी माहिती दिली आहे, त्यात खूप फरक आहे. है.
उत्पन्नाचा लेखा-जोखा
वित्तीय वर्ष 2017-18, 2018-19 च्या ITR मध्ये रिया चक्रवर्तीची उत्पन्नात अचानकपणे वाढ झाली आहे. मात्र ही वाढ कशी झाली? कारण अद्याप या वाढीचा स्त्रोताबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. रियाची 2017-18 मध्ये वार्षिक उत्पन्न 18,75,100 होतं, जे 2018-19 मध्ये 18,33,270 झाली आहे. रियाची 2017-18 मध्ये बाहेरील स्त्रोताकडून झालेले उत्पन्न 2017-18 मध्ये 1,27,625 होतं, मात्र अचानक 2018-19 मध्ये वाढून 2,38,334 इतकी झाली. मात्र 2017-18 मध्ये वार्षिक सर्व सोर्सेजमुळे होणारं सर्वसामान्य बिजेनस इनकम 17,57,442 हून कमी होत 16,04,936 पर्यंत पोहोचलं आहे.
संबंधित -
शेयर आणि FD
आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट रियाच्या ITR मध्ये दिसून येते, ज्यामध्ये तिचा फिक्स्ड एसेट्स 2017-18 मध्ये 96,281 आहे आणि 2018-19 मध्ये फिक्स्ड एसेट्स वाढून 9,05,597 पर्यंत पोहोचली आहे. ही मोठी मार्जिन आहे. रियाच्या शेयर होल्डर फंड 2017-18 मध्ये 34,05,727 आहे, तर 2018-19 मध्ये हा शेयर होल्डर फंड्स 42,06,338 झाला आहे.
ईडीदेखील याचा तपास करीत आहे की 2017-18 मध्ये 34 लाख रुपयांचे शेयर कुठून खरेदी केले. तिचे उत्पन्न तर 18 लाख आहे. रियाचा शेअर होल्डर फंड 2017-18 मध्ये 34 लाखाहून 2018-19 मध्ये 42 लाखांपर्यंत पोहोचला. यानंतर HDFC बँक, ICICI बँकमधील तिच्या एफडीचा तपास केला जात आहे.