'पद्मावती'च्या कलाकारांनी किती घेतलं मानधन?

सिनेमात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहीद कपूरसोबत आदिती राव हैदर आणि अभिनेता जिम सरबही आहेत. आणि या सगळ्या कलाकारांना घसघशीत मानधन मिळालंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2017 06:25 PM IST

'पद्मावती'च्या कलाकारांनी किती घेतलं मानधन?

13 आॅक्टोबर : संजय लीला भन्साळीच्या 'पद्मावती'ची बरीच चर्चा आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याचं कौतुकही केलं. सिनेमात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहीद कपूरसोबत आदिती राव हैदर आणि अभिनेता जिम सरबही आहेत.  आणि या सगळ्या कलाकारांना घसघशीत मानधन मिळालंय.

जिम सरबनं रणवीर सिंगच्या जवळच्या मित्राची भूमिका केलीय. त्यासाठी त्याला मिळालेत 70 लाख रुपये. तर आदिती राव हैदरीला मिळालेत 85 लाख रुपये.

राजपूत राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारणाऱ्या शाहीद कपूरनं 6 कोटी रुपये घेतलेत. सिनेमाचा खलनायक रणवीर सिंगनं भूमिकेसाठी 8 कोटी घेतलेत.

चित्रपटातली मध्यवर्ती भूमिका दीपिका पदुकोणची. तिनं या सिनेमासाठी 11 कोटी घेतलेत.

Loading...

भन्साळी आणि वायकाॅम 18 मिळून या सिनेमाची निर्मिती करतायत. 1 डिसेंबरला पद्मावती रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...