'बाहुबली 2'च्या कमाईत काय काय होऊ शकतं?

'बाहुबली 2'च्या कमाईत काय काय होऊ शकतं?

दुसऱ्या आठवड्यातही बाहुबलीची घौडदौड कायम असून अशीच कमाई राहिली तर महिन्याअखेरपर्यंत बाहुबलीची मजल 3 हजार कोटींकडे जाऊ शकते.

  • Share this:

08 मे : एखाद्या फिल्मनं किती कमाई करावी? सल्लूचा सिनेमा 100 कोटी करतो म्हणून किती कौतुक. पण आता खान कंपनीला नवं आव्हान मिळालंय ते बाहुबली-टू नं अवघ्या दहा दिवसात केलेल्या कमाईचं. कटप्पानं बाहुबलीला का मारलं ह्या प्रश्नाच्या शोधात लोकांनी तिकिटबारीवर रांगा लावल्या आणि अवघ्या 10 दिवसात बाहुबलीनं 1 हजार कोटी रूपयांची कमाई केलीय. दुसऱ्या आठवड्यातही बाहुबलीची घौडदौड कायम असून अशीच कमाई राहिली तर महिन्याअखेरपर्यंत बाहुबलीची मजल 3 हजार कोटींकडे जाऊ शकते.

आतापर्यंत मराठीत फक्त सैराटनं शंभर कोटींचा टप्पा ओलांडलाय. आता बाहुबलीनं प्रादेशिक सिनेमापुढेही नवं आव्हान उभं केलंय. आयपीएल सुरु झालं की सिनेमांचा रिलिज पुढं ढकललं जायचं, आता बाहुबलीचं यश बघितलं तर आयपीएलचे सामने पुढं ढकलावे लागतील अशी स्थिती आहे. कारण अजूनही बाहुबलीचे सकाळी आठचे शो हाऊसफुल्ल आहेत.

'बाहुबली 2'च्या कमाईत काय काय होऊ शकतं?

महाराष्ट्र सरकारनं मोठ्या भीमदेवी थाटात तूर खरेदीसाठी 1 हजार कोटी बाजूला ठेवले

बाहुबलीच्या कमाईत दोन मंगळ मोहिमा फत्ते होतील, आताचा खर्च 450 कोटी रू.

बाहुबलीच्या कमाईत सार्क देशांचे आता सोडले तसे दोन उपग्रह सोडता येतील

मुंबई, पुणे, ठाणे फक्त अशा मोठ्या पालिकांचा अर्थसंकल्पच बाहुबलीच्या कमाईपेक्षा मोठा

महाराष्ट्रातल्या बहुतांश पालिकांचा अर्थसंकल्पही बाहुबलीच्या कमाईपेक्षा कमी

महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला बाहुबलीची कमाई वाटली तर प्रत्येकीला कमीत कमी 3 लाख रूपये मिळतील

First published: May 8, 2017, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading