…म्हणून 2019मध्ये रिलीज होऊनही ‘उरी’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

…म्हणून 2019मध्ये रिलीज होऊनही ‘उरी’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

2019 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार कसा काय मिळू शकतो असा प्रश्न सोशल मीडियावर सध्या उपस्थित केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : उरी : द सर्जिकल स्ट्राइकसाठी आज सेलिब्रेट करण्याचा दिवस आहे. ही सिनेमा यंदाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक या पुरस्कारांसोबतच उरीला सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड म्यूझिक आणि सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन असे दोन पुरस्कार सुद्धा मिळाले. मात्र 2019 मध्ये रिलीज झालेल्या उरी सिनेमाला 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी मानांकन मिळाल्यानं या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारांवर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उठले आहेत.

66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 2018 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमांचा समावेश होणार होता. त्यानुसार 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' जानेवारी  2019 मध्ये रिलीज झाला होता. त्यामुळे अनेकांनी ट्विटरवर उरी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याला विरोध केला. 2019 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार कसा काय मिळू शकतो असा प्रश्न सोशल मीडियावर सध्या उपस्थित केला जात आहे.

कंगना रणौतचा Dhakad Teaser रिलीज, नेटकरी म्हणाले ही तर...

मात्र यामागचं सत्य फार कमी लोकांना ठाऊक आहे. कोणत्याही सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत मानांकन मिळविण्यासाठी  1 जानेवारीच्या आधीच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला सर्टिफिकेट मिळणं गरजेच असतं आणि सुदैवानं उरीला हे सर्टिफिकेट 31 डिसेंबरला मिळालं होतं. त्यानंतर 11 जानेवारी 2019 ला उरी रिलीज झाला.

66th National Film Award : विकी कौशल-आयुष्यमान खुराना ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

उरी दिग्दर्शक आदित्य धर यांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर आपला आनंद व्यक्त केला. त्यानं लिहिलं, धन्यवाद भारत, धन्यवाद सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि नॅशनल अवॉर्ड कमिटीच्या सर्व ज्यूरी मेंबर्सना धन्यवाद. ज्यांनी मला या पुरस्काराच्या योग्यतेचं समजलं. माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यासाठी माझे सिनेमा हेच माझं जग आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकणं हे नेहमीच माझं स्वप्न होतं.

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मध्ये विकी कौशल परेश रावल, मोहित रैना आणि यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमासाठी विकीला सर्वोत्कृष् अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जो त्याला आणि आयुष्यमान खुरानाला विभागून देण्यात आला. आयुष्यमाननं अंधाधुनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. उरी सिनेमाची कथा ही 2016 मध्ये भारतानं केलेल्या सर्जिकल स्टाइकवर आधारित आहे.

प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट

=================================================================

VIDEO: IMDच्या अंदाजामुळे भीती वाढली, पुढचे 4 दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 09:31 AM IST

ताज्या बातम्या