Home /News /entertainment /

बलात्काराच्या आरोपामुळं संपलं 'या' लोकप्रिय अभिनेत्याचं करिअर

बलात्काराच्या आरोपामुळं संपलं 'या' लोकप्रिय अभिनेत्याचं करिअर

त्याच्यावर घरातील मोलकरणीनंच बलात्काराचे आरोप केले. परिणामी आजही तो चित्रपटात काम मिळावं यासाठी आपल्या चपला झिजवत आहे.

    मुंबई 15 मे: शायनी अहुजा (Shiney Ahuja) हा एकेकाळी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जायचा. ‘हजारों ख्वाहिशों ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एण्ट्री मारणाऱ्या शायनीनं ‘गँगस्टर’, ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन ए मेट्रो’ यांसारख्या चित्रपटातून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या पंक्तित त्याला स्थान मिळालं होतं. परंतु करिअरच्या शिखरावर असतानाच त्याच्यासोबत अशी एक घटना घडली की ज्यामुळं त्याचं करिअर उद्वस्त झालं. (Shiney Ahuja's Rape Controversy) त्याच्यावर घरातील मोलकरणीनंच बलात्काराचे आरोप केले. परिणामी आजही तो चित्रपटात काम मिळावं यासाठी आपल्या चपला झिजवत आहे. 2009 साली शायनीवर त्याच्या घरातील मोलकरणीनं बलात्काराचे आरोप केले होते. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. हे प्रकरण त्यावेळी चांगलंच तापलं होतं. पुढे दोन वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरु राहिलं. शायनीला दरम्यान तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. या संपूर्ण प्रकरणामुळं तो पार नैराश्येत गेला होता. त्याची लोकप्रियता एकाएकी संपली होती. ती सध्या काय करतेय? बॉलिवूडमधून अचानक गायब झाली होती ट्विंकल खन्नाची बहिण मात्र दोन वर्षांच्या दिर्घ खटल्यानंतर त्या मोलकरणीनं अचानक आरोप मागे घेतले. दोघांमध्ये झालेला शरीरसंबंध हा दोघांच्या संमतीनंच झाला होता असं तिनं मात्न केलं. शायनीवर आरोप करण्यासाठी तिला एका महिलेनं प्रोत्साहित केलं होतं. अधिक पैसे मिळवण्याच्या लालसेनं तिनं असे आरोप केलं. असं वक्तव्य तिनं कोर्टात दिलं. मात्र हे प्रकरण संपेपर्यंत शायनी सतत तुरुंगाच्या वाऱ्या करत होता जामिनावर बाहेर येत होता. अखेर 2015 च्या आसपास हे प्रकरण संपलं. मात्र शायनीचं करिअर देखील त्यासोबत संपलेलं होतं. आज कुठलाच दिग्दर्शक त्याच्यासोबत काम करण्यास तयार नाही. तो गेली कित्येक वर्ष निर्मात्यांच्या ऑफिसच्या चकरा मारतोय परंतु कोणीही त्याला काम देण्यास तयार नाही. सध्या तो बेरोजगार अवस्थेतच आपलं आयुष्य व्यतीत करत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Crime, Entertainment

    पुढील बातम्या