मुंबई, 22 सप्टेंबर : आज ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
अनेक मराठी चित्रपटांमध्ये आशालता यांनी चांगल्या भूमिका केल्या आहेत. अनेकदा त्या आईच्या भूमिकेत दिसल्या. नाटकांपासून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यांनी 100 हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्या सध्या एका खासगी मनोरंजन वाहिनीवरील 'आई माझी काळुबाई' या मालिकेचं शूटिंग करीत होत्या. साताऱ्यातील लोणणं येथे या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी मुंबईतून एका डान्स ग्रुप तेथे चित्रीकरणासाठी गेला होता. त्यातून कोरोनाचा फैलाव झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. 'आई माझी काळुबाई' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच चित्रीकरणादरम्यान आशालता वाबगावकरांसह 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री आशालता वाबगावकरांची भूमिका आहे. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यात आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठीतील अनेक कलाकारांची हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
हे ही वाचा-मराठी मालिकेचं शूटिंग ठरलं धोकादायक; 27 जणांना संसर्ग, अभिनेत्री गंभीर
आशालता यांची कारकीर्द
रंगभूमीवरील प्रवास
- मत्स्यगंधा
- गुंतता ह्रदय हे
- वाऱ्यावरची वरात
- छिन्न
- महानंदा
रुपेरी पडद्यावरील प्रवास
- 100 हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय
- जंजीर (1973)
- चलते चलते (1976)
- अपने पराये (1981)
- आहिस्ता आहिस्ता (1981)
- उंबरठा (1982)
- शौकीन (1982)
- लव्ह इन गोवा (1983)
- कूली (1983)
- सदमा (1983)
- हमसे है जमाना (1983)
- वहिनीची माया (1985)
- शराबी (1984)
- अंकुश (1986)
- गंमत जंमत (1987)
- घायल (1990)
- माहेरची साडी (1991)
- फौजी (1994)
- अग्नीसाक्षी (1996)
- बेटी नंबर 1 (2000)
- वन रूम किचन (2011)
- सनराईज (2014)