Housefull 4 Review : विकेंडला सिनेमा प्लान करण्याआधी वाचा ‘हाऊसफुल 4’ बद्दल काय म्हणतायत प्रेक्षक

Housefull 4 Review : विकेंडला सिनेमा प्लान करण्याआधी वाचा ‘हाऊसफुल 4’ बद्दल काय म्हणतायत प्रेक्षक

हाऊसफुल 4 रिलीज झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा ‘हाऊसफुल 4’ नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा रिलीज झाल्यावर त्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा झाल्या होत्या. यातील अक्षयचा लुक ते सिनेमाची कथा इथंपर्यंत सर्वच गोष्टीं प्रेक्षकांना आवडल्या होत्या. पण सिनेमा पाहिल्यानंतर सर्वांची निराशा झाली. हाऊसफुल 4 रिलीज झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेक प्रतिक्रिया या नकारात्मक आहेत. हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेक लोक नाराज झालेले दिसत आहेत.

हाऊसफुल 4’ बद्दल ट्विटरवर #Housefull4Review हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. हाच हॅशटॅग वापरुन अनेक लोकांनी सिनेमा पाहिल्यानंतर त्यावर आपल्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. एका युजरनं रागाचे इमोजी वापरुन लिहिलं, मला माझे पैसे परत हवे आहेत. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलं, हाउसफुल 4 सर्वात कंटाळवाणा सिनेमा आहे. या सिनेमातील कॉमेडी अत्यंत खराब आहे. सिनेमाचा फर्स्ट हाफ हा खूप कंटाळवाणा आहे. तर सेकंड हाफ सुद्धा म्हणवा तितका चांगला नाही. हा सिनेमा पाहणं म्हणजे जगातील सर्वात मोठा अभिनशाप आहे. लोकांना हा सिनेमा पाहिल्यावर मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल.

शाहरुख-आमिरच्या स्टारडमला धोका! 'हे' नवे चेहरे चढतायत वरचढ

याशिवाय या सिनेमावर इतर अनेक नकारात्मक कमेंट्स मिळाल्या आहेत. पण काही लोकांना मात्र हा सिनेमा खूप आवडला आहे. काहींनी हाउसफुल सीरिजमधील हा सर्वात चांगला सिनेमा असल्याचं म्हटलं आहे. तर काहींना हा सिनेमा फुल एंटरटेनमेन्ट असल्याचं म्हटलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र हा सिनेमा त्या अपेक्षांमध्ये उतरु शकला नाही.

दीपिका सांगणार द्रौपदीच्या नजरेतून महाभारत, पुरुष पात्रांबद्दल म्हणाली...

जवळपास 80 कोटींचं बजेटमध्ये हा सिनेमा तयार केला गेला आहे. या मल्टीस्टारर सिनेमामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त बॉबी देओल, रितेश देशमुख, राणा दग्गुबाती, चंकी पांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, कृति सेनन, कृति खरबांदा आणि पूजा हेगडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमाची कथा दोन भागांमध्ये विभागण्यात आली आहे. यात पुनर्जन्म ही संकल्पना कॉमेडीतून दाखवण्यात आली आहे.

साधी गोष्ट कळत नाही! Dabangg 3 च्या ट्रेलरमध्ये मोठी चूक

==============================================================

VIDEO : 'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

Published by: Megha Jethe
First published: October 25, 2019, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading