Home /News /entertainment /

'या' तीन मुलांमध्ये उभा आहे महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता; अभिनयासोबत राजकारणातही सक्रीय, ओळखलात का कोण?

'या' तीन मुलांमध्ये उभा आहे महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता; अभिनयासोबत राजकारणातही सक्रीय, ओळखलात का कोण?

तीन मुलांमध्ये डावीकडे उभा आहे तुमचा लाडका अभिनेता; ओळखलात का?

तीन मुलांमध्ये डावीकडे उभा आहे तुमचा लाडका अभिनेता; ओळखलात का?

सोशल मीडियावर सध्या मराठीतील एका आघाडीच्या अभिनेता तसेच निवेदकाचा फोटो व्हायरल होत आहे. अनेकजण हा फोटो ओळखण्यात अपयशी ठरलेत. बघा तुम्हाला ओळखता येतो का हा अभिनेता.

  मुंबई,22 मे: हल्ली सोशल मीडियावर कलाकारांचे बालपणीचे अनेक फोटो झपाट्याने व्हायरल होत असतात. त्यातील काही कलाकारांना ओळखणं ही बऱ्याचदा कठीण होऊन बसतं. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. आपल्या लाडक्या झी मराठीने (Zee Marathi) हा फोटो शेअर केला असून यात तिन लहान मुले दिसत आहे. फोटोच्या डाव्याबाजूला उभा असलेला मुलगा आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आणि आघाडीचा लाडका निवेदक आहे. इतकंच नाही तर अभिनयासोबत राजकारण आणि समाजकारणात देखील सक्रीय आहे.  अनेक जण या अभिनेत्याला ओळखू शकले नाहीत. कोण आहे हा अभिनेता? असा प्रश्न सर्वांना पडला. झी मराठीने (Zee Marathi) शेअर केलेल्या या फोटोमधील लहान मुलगा म्हणजे सर्वांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आहेत (Aadesh Bandekar Childhood Picture) आदेश बांदेकर यांनी स्वत: त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन त्यांचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. आता आदेश बांदेकरांनी मध्येच त्यांचा बालपणीचा फोटो का शेअर केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच कारण म्हणजे आदेश बांदेकर सध्या महामिनिस्टरच्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत (mahaminister in ratnagiri) रत्नागिरीत पोहोचत असतानाच त्यांनी इन्स्टाग्रामवरुन 'Ask me Anything' असा खेळ खेळला. या खेळात त्यांना त्यांच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यातील एका चाहत्याने बांदेकरांना त्यांचा बालपणीचा फोटो शेअर करण्यास सांगितल्याने त्यांनी चाहत्याची इच्छा पूर्ण करत फोटो शेअर केला. फोटोत आदेश बांदेकर यांच्यासोबत त्यांचे दोघे भाऊ आहेत असे म्हटले जात आहे. हेही वाचा - VIDEO: महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावर वहिनींचा 'सामी' गाण्यावर धम्माल डान्स व्हायरल आदेश बांदेकरांनी बालपणीच्या फोटोसह पत्नी सुचित्रासोबतचा लग्नातील फोटो देखील शेअर केला आहे. तो फोटो देखील चाहत्यांच्या पसंतील उतरला आहे.
  भावोजींनी रत्नागिरीत पोहोचताच गावच्या स्थानिक हॉटेलात गरमा गरम फक्कड चहा आणि भजीचा आस्वाद घेतला. 'रोड ट्रिप विथ आदेश बांदेकर' (#RoadTripWithAadeshBandekar)  असा हॅशटॅग वापरत आदेश भावोजींनी त्यांचा रत्नागिरी दौरा सुरू केला आहे. मुंबई ते रत्नागिरी ही रोड ट्रिप भावोजींनी फार एंजॉय केली आहे. गाणं म्हणत त्यांनी प्रवास सुखकर केला. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ देखाल चांगलाच व्हायरल होत आहे.
  महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावर वहिनींच्या नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून हजारो वहिनींनी खेळात सहभाग घेण्यासाठी हजेरी लावली आहे. या प्रवासात भावोजींनी महामिनिस्टरच्या पुढच्या केंद्रांच नाव देखील सांगितलं असून रत्नागिरी दौऱ्यानंतर महामिनिस्टरचा खेळ कोल्हापूरात रंगणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या