मुंबई, 29 मे- झी मराठीवरील लोकप्रिय शोपैकी होम मिनिस्टर (homeminister ) हा एक शो आहे. सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर हा शो होस्ट करताना दिसतात. गेल्या 18 वर्षापासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकर ( aadesh bandekar) वहिनींना मानाची पैठणी देऊन सन्मान करत असतात. आता गृहिणींना 11 लाखांची पैठणी मिळवण्याची संधी या शोच्या माध्यमातून मिळाली आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत या शोचे चाहते आहेत. या शोमुळे आदेश बांदेकर महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांच्यात लोकप्रिय झाले. नुकताच आदेश बांदेकर यांनीा कोल्हापूर दौरा केला. यावेळी त्यांनी वेळ काढून त्यांच्या एका खास फॅन्सला भेटण्यासाठी सांगली गाठली. ही फॅन कोण साधीसुधी नाही तर 100 वर्षांच्या आजीबाई आहेत. या आजीबाईंना भेटण्यासाठी आदेश बांदेकर यांनी सांगली गाठली व व आपल्यावर प्रेम करणाऱ्या या आजीला कडकडून मिठी मारत तिची भेटण्याची इच्छा पूर्णा केली.
सांगलीतील नलिनी जोशी यांनी आज वयाची 99 वर्षे पूर्ण करत 100 व्या वर्षात पदार्पण केलं. या कार्यक्रमाला अभिनेते आदेश बांदेकर यांनी उपस्थिती लावत त्यांना पैठणी भेट देत मनसोक्त गप्पाही मारल्या. यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांना त्यांच्या आईची आठवण आली आणि या आठवणीने बांदेकर यांचे डोळे पाणावले. झी मराठीनं या कार्यक्रमाचे काही फोटो देखील इन्स्टावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की,कोल्हापूर महामिनिस्टर प्रवासादरम्यान सांगली येथील १०० वर्षांच्या या आजींना खास भेटायला गेले आदेश बांदेकर.
नलिनी जोशी कोण आहेत?
मागच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सांगलीतील नलिनी जोशी या आजीच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहून आदेश बांदेकर यांनी त्यांचं कौतुक करण्यासाठी मी प्रत्यक्ष सांगलीत येईन असं सांगितलं होतं. मग काय आदेश बांदेकर यांनी मनावर घेतलं आणि या आजीबाईंची भेट घेतली.
या वयातही आजीबाईंनी गाण्याची आवड जोपासली आहे. आदेश बांदेकर यांना पाहून आजींना आश्चर्य वाटलंच, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाचं आनंद पाहायला मिळाला.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.