'या' हाॅलिवूड स्टार्सनी दिला कॅन्सरशी लढा!

बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही अनेक स्टार्सना कॅन्सरशी दोन हात करावे लागले. त्यातले काही जणांनी यशस्वीरित्या या दुर्धर आजाराशी दोन हात करण्यात यशस्वी ठरले तर काही जणांना मात्र हार पत्करावी लागली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 6, 2018 04:20 PM IST

'या' हाॅलिवूड स्टार्सनी दिला कॅन्सरशी लढा!

विराज मुळे, 06 जुलै : बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही अनेक स्टार्सना कॅन्सरशी दोन हात करावे लागले. त्यातले काही जणांनी यशस्वीरित्या या दुर्धर आजाराशी दोन हात करण्यात यशस्वी ठरले तर काही जणांना मात्र हार पत्करावी लागली. परदेशात अत्याधुनिक उपचार मिळाल्याने अनेकांनी या आजाराला सढळ हस्ते तोंड दिलं.

कॅन्सरसारखा दुर्धर आजार कधी कुणाला कुठे गाठेल ते कुणालाही सांगता येणार नाही. बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या रोगाचा सामना करावा लागला.

यात सगळ्यात पहिलं आणि मोठं नाव आहे ते एक्स मेन सिरिजमुळे जगभरात लोकप्रिय ठरलेल्या ह्यु जॅकमनचं. ह्युला त्वचेच्या कॅन्सरने ग्रासलं. त्यानंतर त्यांच्यावर तीन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र अजूनही शस्त्रक्रिया कराव्या लागतील असं निदान डॉक्टरांनी केलं. त्यानंतर कॅन्सरशी सुरू असलेला त्याचा लढा आजही कायम आहे. मात्र अजूनही त्यातून तो पूर्णपणे बरा झालेला नाही.

कॅन्सरने ग्रासलेला दुसरे मोठे बॉलिवूड स्टार आहेत रॉबर्ट डी निरो. भारतीय प्रेक्षक खरं तर त्यांना गॉडफादर या सिनेमामुळे जास्त ओळखतात. मात्र त्यापेक्षा अनेक उत्तम सिनेमे केलेल्या या अभिनेत्याला प्रोस्थेट कॅन्सरने ग्रासलं. त्यानंतर गेली काही वर्ष त्यांनी या आजाराशी झुंज दिली. उपचाराअंती त्यांचा कॅन्सर बरा झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलंय.

हॉलिवूडच्या अनेक अॅक्शनपॅक्ड सिनेमात दिसलेला चेहरा म्हणजे अभिनेता मिस्टर टी. उत्तम शरिरयष्टी असलेल्या या अभिनेत्याला त्या जोरावर अनेक हॉलिवूड सिनेमे मिळाले. रॉकीमध्ये सिल्वेस्टर स्टेलोनसोबत झालेली त्याची फाईट विसरता येणं शक्यच नाही. मात्र याच टी ला टी सेल लिम्फोमाचं निदान झालं आणि त्यावर त्याने काही वर्ष उपचार घेतले. कॅन्सरशीही टीने तितक्याच जिद्दीने फाईट दिली.

केथी बेन्स या हॉलिवूडमधल्या चरित्र अभिनेत्री. टायटॅनिकसारख्या अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांनी केलेला अभिनय आजही आपण विसरलेलो नाही. मात्र केथी यांना त्यांच्या करिअरमध्ये कॅन्सरने दोनदा ग्रासलं. 2003 साली त्यांना पोटाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं त्यातून मोठ्या जिद्दीने सावरल्यानंतर 2012 साली त्यांना पुन्हा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं. या रोगाशी त्यांचा सामना वयाच्या 74 वर्षीही चालू आहे.

अभिनेत्री जेन फोंडा हिलाही ब्रेस्ट कॅन्सरने ग्रासलं होतं. त्यानंतर तीने स्वतः ब्लॉग लिहून चाहत्यांना आपल्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. तिच्या या विनंतीला मान देऊन चाहत्यांनी तिला अनेक पत्रं लिहिली. 2018 साली पुन्हा एकदा ट्युमर सदृष्य गोळा तिच्या ओठांमधून काढण्यात आला.

सेक्स इन द सिटी या मालिकेमुळे भारतात फारच लोकप्रिय झालेली अभिनेत्री सिंथिया नेक्सन हिलाही ब्रस्ट कॅन्सरने ग्रासलं.मोठ्या हिंमतीने तीने या रोगाशी दोन हात केले..आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला सुरूवात केली.

ऑस्ट्रेलियन पॉप गायिका कायली मिनॉग ही तुम्हाला कदाचित आठवत असेल. अक्षय कुमारच्या ब्लू या सिनेमात अक्षयसोबत चिगी विगी करताना ती आपल्याला दिसली होती. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती भारतातही येऊन गेली. याच कायलीला ब्रेस्ट कॅन्सरने ग्रासलं होतं. तिलाही प्रसिद्धीचं वलय बाजूला ठेवून या रोगाशी दोन हात करावे लागले. अखेर तिचा हा लढा यशस्वी ठरला. आज ती या रोगातून पूर्णपणे बरी झालीय.

हॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्रींमध्ये जिचं नाव घेतलं जातं ती म्हणजे एलिझाबेथ टेलर. या सौंदर्यवतीच्या रूपाचं गारूड अवघ्या जगावर होतं. मात्र तिलाही त्वचेच्या कॅन्सरने ग्रासलं होतं..2002 साली या रोगाचं निदान झाल्यावर तिने रेडिएशनचे उपचार घ्यायला सुरूवात केली.तिचा कॅन्सरशी सुरू असलेला लढा तब्बल दहा वर्ष सुरू राहिला. अखेर 2012 मध्ये तिचे सगळे प्रयत्न तोकडे संपले आणि तिचं निधन झालं.

एकूणच काय तर परदेशातील कलाकारांनीही या आजाराने ग्रासलं.मात्र जिद्दीच्या जोरावर प्रगत उपचारांमुळे त्यांना या आजाराशी दोन हात करणं सोपं गेलं एव्हढंच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close