दरम्यान अचानक माइलीचा टॉप निसटला.आणि ती वार्डरोब मालफंक्शनला बळी पडली. परंतु तिने घाबरून न जाता. फारच धैर्याने सर्वकाही सांभाळून घेतलं. टॉप निसटताच गायिकेने अतिशय चातुर्याने आपल्या एका हाताने टॉप सांभाळला. त्यानंतर काही क्षणात ती लाल कलरचा जॅकेट परिधान करून सर्वांसमोर आली. आणि तितक्याच उत्साहात आपला परफॉर्मन्स चालू ठेवला. त्यांनतर माइलीने म्हटलं, 'आज सर्वच लोक माझ्याकडे बघत आहेत. कारण स्टेजवर मी इतके कपडे क्वचितच कधी परिधान केले असें'. (हे वाचा:BB15 मध्ये होणार नव्या चॅलेंजर्सची एन्ट्री! बबितासह या कलाकारांचा समावेश ) हा व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच लोक माइलीच्या धाडसाचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक करत आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की ती एक पक्की परफॉर्मर आहे. तिला अशा गोष्टी हाताळणं सहज शक्य आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. परंतु काही लोक कमेंट्स करून तिच्या ड्रेस चॉईसवर प्रश्न उपस्थित करत आहेत.Miley Cyrus began 2022 with a wardrobe malfunction. #MileysNewYearsEveParty pic.twitter.com/D3BF4JNA0X
— Dave Quinn (@NineDaves) January 1, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Video viral